नगर - देशात गरजूंची संख्या मोठी आहे. त्या प्रमाणात सामाजिक उपक्रमांची कमतरता आहे. आपल्याकडे रोज काही ना काही दिवस साजरे केले जातात. अशावेळी समाजाच्या गरजा ओळखून त्या दिवसांना ते गरजूंना गरज असलेले उपक्रम राबविले पाहिजेत. असे प्रतिपादन पटेल स्पेशालिटी क्लिनिकचे डॉ. अशपाक पटेल यांनी केले.
पटेल स्पेशालिटी क्लिनिक व अलकरम हॉस्पिटल तर्फे अहमदनग शहराच्या स्थापना दिनानिमित्त मोफत थाॅयराॅईड, युरिक एसिड तपासणी, सर्वरोग तपासणी, डोळे तपासणी सहुलतीत रक्त लघवी तपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. अशपाक पटेल, डॉ जहीर मुजावर, मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, अल करम सोसायटीचे तौफिक तांबोली, शेरअली शेख आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ पटेल म्हणाले की संपूर्ण जगात भारतच एकमेव असा देश आहे जिथे वेगवेगळ्या धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. हाच या देशाचा खरा गौरव असून, याच ओळखीने भारत अख्ख्या जगात ओळखला जातो. अशा देशात रोज काही न काही सण उत्सव साजरे करताना समाजाच्या हिताचे उपक्रम राबविल्यास गरजूंच्या गरजांना हातभार लागेल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आबीद खान यांनी केले. सुत्रसंचालन शेरअली शेख यांनी केले. तर आभार तौफिक तांबोली यांनी मांनले.
إرسال تعليق