अहमदनगर - नागोरी मुस्लिम मिसगर जामत ट्रस्टच्या अहमदनगर उर्दू हायस्कुलचा दहावीचा निकाल 93 टक्के लागला.
हायस्कूल मध्ये प्रथम क्रमांक अन्सारी आयेशा राफिउल्ला ७३.८०%, द्वितीय शेख फातेमा समीर ७२.४०% तर तृतीय शेख अर्शिया तौसीफ ७१.४०% टक्के गुण प्राप्त केले.
एस.एस.सी. मार्च २०२५ मध्ये उतुंग यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मिसगर ट्रस्ट व बोर्ड ऑफ ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष युनुस सुलतान तांबटकर, सचिव इमरान शफी अहमद शेख, खजिंनदार इमरान जमीर खान विश्वस्त फरहान खालीद खान व नवीद तांबटकर इतर बोर्ड ऑफ ट्रस्टीजनी शुभेच्छा दिल्या.
إرسال تعليق