अहमदनगर - आजच्या व्यस्त जीवनामध्ये व शासकीय नोकरीत उच्च पदावर असताना सुद्धा नगर येथील उर्दू शायर सलीम खान यावर यांनी उर्दू साहित्याची आपली आवड पूर्ण करून कवितासंग्रह लिहून ते प्रकाशित केले. व नियमित उर्दू साहित्याची सेवा करत राहिले असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव प्रसिद्ध कवयत्री डॉ. कमर सुरुर यांनी केले.
मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी तर्फे नगर येथील प्रसिद्ध कवी सलीम खान यावर यांच्या समृतिप्रित्यर्थ ताजियती नशिस्त मुशायराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. नवेद बिजापूरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर, प्रा.डॉ. महबूब सय्यद, शरीफ खान, जीवन फाउंडेशनचे अध्यक्ष आरिफ सय्यद, कलीम तांबटकर, मुस्कान असोसिएशनचे अध्यक्ष शफकत सय्यद, कलीम शेख, मखदूम सोसायटीच्या डॉ. कमर सुरूर, निसार बागवान, तन्वीर चष्मावाला, जावेद मास्टर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुशायराचे दिप प्रज्वलन युनुसभाई तांबटकर यांनी केले. शरीफ खान, सय्यद खालील व डॉ. कमर सुरुर यांनी सलीम खान यावर यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले.
मुशायरा मध्ये सलीम यावर यांच्यावर लिहिलेल्या कविता बिलाल अहदनगरी, सुलेमान अहमदनगरी, सय्यद खलील, डॉ.कमर सुरूर, आसिफ सर, नवेद बिजापूरे, शरीफ खान, हबीब पेंटर, मुन्नवर हुसैन यांनी सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
अध्यक्षपदावरून बोलताना प्राध्यापक नवेद बिजापुरे म्हणाले की भविष्यातील उर्दू साहित्यकांसाठी आजच्या साहित्यकांनी आपले साहित्य पुस्तक रूपात प्रसिद्ध केले पाहिजेत असे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबिद खान यांनी केले. तर आभार निसार बागवान यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मखदूम सोसायटीच्या सर्व सदस्यांनी भरपूर परिश्रम घेतले.
إرسال تعليق