अहमदनगर - अहमदनगर येथील अलफलाह एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटी संचलित मातोश्री उर्दू हायस्कूल आलमगीर नागरदेवळे या विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे. एसएससी परीक्षा मार्च-२०२५ च्या परीक्षेत विद्यालयाने ९८ टक्के निकाल प्राप्त केला आहे. एसएससी परीक्षेस विद्यालयातून ४३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. शाळेतील विद्यार्थिनी खान बुशरा फिरोज हिने ८६.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर शेख हुमेरा एजाज हिने ७६ टक्के, सय्यद सफिना रियाज हिने ७५.२० टक्के गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक प्राप्त केला.
यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे प्रमुख कार्यवाह प्रा.डॉ.शेख अब्दुस सलाम अब्दुल अजीज, मुख्याध्यापक शेख जमीर अहमद इस्माईल तसेच वर्गशिक्षिका खान सफिया सलीम, शेख महेनाज़ अ. सलाम, शेख एजाज अहमद अ. कुडूस, शेख अंजुम सत्तार यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शेख अ. हसीब अ. सलाम, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व शिक्षक-पालक संघाचे सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर यांच्यासह ग्रामस्थ पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Post a Comment