महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांचा इतिहास व सौंदर्य ठाकूरदास परदेसी यांनी चित्रातून मांडला - डॉ. कमर सुरुर

अहमदनगर - गड किल्ल्यांचा संपूर्ण देशाला मोठा इतिहास आहे. जुने तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी राजे महाराजे यांनी बांधलेले महाल किल्ले एक उत्तम साधन आहे. आज एवढे तंत्रज्ञान असून सुद्धा जुन्या काळातील तो टिकाऊपणा व सौंदर्य नवीन वास्तूंना येत नाही. उलट नवीन पिढी सुद्धा जुन्या वास्तूंचा सुंदरपणा आपल्या नवीन वास्तूमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. अशा या वास्तूंची भ्रमंती करून ठाकूरदास परदेसी यांनी महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा सौंदर्य आपल्या कॅमेरयात कैद करून तो चित्राच्या रूपाने आपल्यासमोर मांडला आहे. असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ कमर सुरुर यांनी केले.
मख़दुम सोसायटी, रहमत सुलतान फाउंडेशन व अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने अहमदनगर शहराचे 535 व्या स्थापना दिना निमित्त महाराष्ट्रातील दोनशे पेक्षा जास्त गड किल्ल्यांची भ्रमंती करणारे ठाकूरदास परदेसी यांच्या चित्रांचे प्रदर्शन सर्जेपुरा येथील रहमत सुलतान सभागृहात आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. कमर सुरुर, बोलत होत्या यावेळी रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनुसभाई तांबटकर, मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान,संध्याताई मेढे, क्वाईन संग्रहक सचिन डागा, पंकज मेहेर, डॉ. परवेज अशरफी, मुस्कान असोसिएशनचे शफकत सय्यद, फिरोज शेख, आर्किटेक फिरोज शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ कमर सुरुर म्हणाले की असे प्रदर्शन नेहमी आयोजित होणे गरजेचे आहे. यामुळे नवीन पिढीला आपला इतिहास जाणून घ्यायची संधी मिळते. व ज्यांनी प्रत्यक्ष गड किल्ले बघितले नाहीत ते या चित्रांचे माध्यमातून व त्यांच्या संग्रहका कडून बरीच माहिती मिळवता येते असे सांगितले. 
चित्र प्रदर्शनास मोठा प्रतिसाद मिळाला. लोकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद खान यांनी केले. तर आभार शफकत सय्यद यांनी मांनले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा