महाराष्ट्र परिट धोबी सेवा मंडळाच्या प्रदेश महासचिवपदी सुनील फंड !

कोपरगांव / प्रतिनीधी:
कोपरगांव शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनिल फंड यांची महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी नुकतीच निवड करण्यात आली.
श्री. फंड यांच्या सामाजिक आध्यात्मिक कार्याची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष खंडेराव कडलग तसेच वरिष्ठ पदाधिकारी यांनी सर्वानुमते त्यांची नियुक्ती जाहीर करून मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले आहे.
 श्री. सुनील फंड यांनी कोपरगांव परिट धोबी सेवा मंडळाचे शहराध्यक्षपद दहा वर्ष भुषविले. त्यानंतर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदी असताना सलग सात वर्ष त्यांनी विविध उपक्रम राबविले. समाजहितासाठी समाजोपयोगी खुप कामे केली.त्यांच्या प्रयत्नाने कोपरगांव शहरात २००४ पासुन पाच गुंठे क्षेत्रावर श्री संत गाडगेबाबा सांस्कृतिक भवन उभारण्यात प्रगती पथावर आहे.
विशेषतः कोपरगांव तालुका परिट धोबी सेवा मंडळाचे सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन अहिल्यानगर‌ जिल्ह्यात‌ सर्वात मोठं राष्ट्रसंत गाडगेबाबा सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे. त्याठिकाणी‌ गोरगरिबांना साखरपुडा, विवाह समारंभ आदी प्रसंगी भाडे तत्वावर अल्पदरात देण्यात येते.
श्री.फंड यांना पाच वेळा विविध सामाजिक संस्थांकडून समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक आणी राजकीय क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटविणाऱ्या सुनील फंड यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगांव तालुक्यात स्वतःचं अस्तित्व निर्माण करून  साईगांव पालखी सोहळा, मुंबादेवी तरुण मंडळाचे वतीने गेल्या तीन वर्षांपासून १४८० मुलींना मर्दानी खेळ लाठी,काठी, तलवार बाजी, दांडपट्टा खेळाची सुरुवात केली.आजही अविरतपणे ते चालू आहे.
करोना काळात दोन महिने साईगाव पालखी सोहळ्याच्या वतीने २५०० जणांनां रोज २ वेळा घरपोहच जेवणाची डबे पोहोचवले. त्यांनी आपल्या सुकार्याच्या बळावर सामाजात आपली अनोखी ओळख निर्माण केली आहे.
कोपरगांव तालुक्यात समाजाच्या महिलांना आदर्श माता पुरस्कार, युवक उद्योजक, समाजभूषण पुरस्कार आदी पुरस्काराने गौरविण्याचा त्यांचा संकल्प आहे.
त्यांच्या या नवनियुक्तबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या भावी उज्वल कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई 
वडाळा महादेव ता.श्रीरामपूर 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा