येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव दत्तात्रय उपाध्ये तर खजिनदारपदी युवा कार्यकर्ते सुयोग संजय बुरकुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी अहिल्यानगर येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडून ट्रस्ट नोंदणी बदलविषयक पत्र प्राप्त झाल्यावर ही माहिती दिली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजीव रावसाहेब शिंदे, कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांच्याशी झालेली चर्चा होऊन संबंधित नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नामदेव विश्वनाथ सुकळे व खजिनदार पुष्पाताई सुखदेव सुकळे यांचे निधन झाल्यावर त्यांच्या जागेवर नवीनियुक्ती आणि मान्यतापत्र याविषयी सुखदेव सुकळे यांनी निवेदन केले. डॉ. बाबुराव उपाध्ये आणि सुयोग बुरकुले यांनी प्रतिष्ठानचे उपक्रम अधिक प्रभावीपणे आयोजित करण्यात पुढाकार घेऊ असे सांगून आभार व्यक्त केले. पदाधिकारी यांनी नूतन ट्रस्टीचे अभिनंदन केले.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई -
वडाळा महादेव
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
إرسال تعليق