हिंद सेवा मंडळाच्या क.जे. सोमैया हायस्कूलमध्ये १ मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्रीरामपूर येथील प्रसिद्ध डॉक्टर जोस्त्ना तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यालयाचे विद्यमान चेअरमन रणजीत श्रीगोड, शंभूक विद्यार्थी वस्तीगृहाचे अधिक्षक अशोक दिवे, प्रशासनाधिकारी भि.का. कांबळे, शालेय समिती सदस्य सुर्यकांत कर्नावट, मुख्याध्यापक भुषण गोपाळे, डॉ. बा.ग. कल्याणकर रात्र प्रशालेचे मुख्याध्यापक दत्तात्रय कांबळे, विद्यालयाचे पर्यवेक्षक कल्याण लकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.तांबे यांनी विद्यालयातील सर्व यशस्वी, गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.
याप्रसंगी विद्यालयाचे चेअरमन रणजित श्रीगोाड यांनी आपल्या मनोगतामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आठवणींना उजळा दिला व जागतिक कामगार दिनाचे महत्त्व विशद केले.
शंभूक विद्यार्थी वस्तीगृहाचे अधिक्षक दिवे सर यांनी आपल्या मनोगतामध्ये महाराष्ट्र संतांची भूमी आहे. तसेच एक मे महाराष्ट्र दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले व महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या विद्यर्थांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अविनाश राऊत, सूत्रसंचालन कुलभूषण धोंडलकर , संकेत गंधे यांनी केले. या कार्यक्रमास , शिक्षण प्रेमी नागरिक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व अध्यापक सेवक वृंद आदि प्रयत्नशील होते.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर -9561174111
Post a Comment