...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरून गायब होऊ शकतो - मेजर कृष्णा सरदार

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
२२ एप्रिल २०२५ रोजी  पहलगाम येथे पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट पसरली दहशतवाद्यांनी केलेला हा भ्याड हल्ला पर्यटकांवर नसून भारताच्या सार्वभौमत्वावर होता त्यामुळे भारत पाकिस्तानच्या या भ्याड हल्यास ७ मे रोजी १ वाजता मध्यरात्री भारताच्या वायुदलाने पाक व्याप्त काश्मीरवर हल्ले केले त्या हल्ल्यात नऊ दहशतवादी तळावर हल्ले करून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे, या हल्ल्यामध्ये लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद चे शेकडो मोठे दहशतवादी ठार झाले आहेत भारतीय हवाई दलाने जवळपास २३ मिनिटे हल्ले केले. भारताने केलेल्या या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले या हल्ल्यात ज्या भारतीय महिलांचे कुंकू (सिंदूर) पुसले गेले त्या महिलांच्या सन्मानार्थ या मोहिमेला लष्कराने ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले आणि ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून भारतीय सैन्याने पहेलगाम येथे निष्पाप मरण पावलेल्या २६ पर्यटकांच्या हत्येचा बदला घेऊन  पाकिस्तानला जशास तसे उत्तर देणाऱ्या भारतीय सैन्याच्या या गौरव पूर्ण कामगिरीने १४० कोटी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. भारतीय सैन्याच्या या कामगिरीचा देशवासीयांना सार्थ अभिमान आहे त्यामुळे भारतीय सैन्यापुढे संपूर्ण देश नतमस्तक आहे आणि या माध्यमातून भारताकडे तिरक्या नजरेने जो पाहील त्याला भारत घरात घुसून मारेल असा इशाराच भारताने संपूर्ण जगाला दिला आहे, सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्याची गय केली जाणार नाही हे भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा दाखवून दिले आहे ही मोहीम यशस्वी करून भारतीय सैन्य दलाने आपले सामर्थ्य जगाला दाखवून दिले आहे या आधी देखील सन २०१६ व २०१९ मध्ये भारताने याच प्रकारचा हल्ला करून पाकिस्तानला इशारा दिला होता मात्र दोनदा हवाई  हल्ले झाल्यानंतर देखील पाकिस्तानची खोड मोडली नाही तरीही दहशतवाद्यांना आर्थिक आणि लष्करी मदत करणे चालू ठेवले त्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागले आता तरी पाकिस्तानने शहाणे व्हावे दहशतवाद्यांना केली जाणारी लष्करी व आर्थिक मदत थांबवावी नाहीतर भारतीय सेना याही पेक्षा मोठी कारवाई करेल पाकिस्तानने चीनच्या भरोशावर भारताशी दोन हात करू नयेत आणि प्रयत्न देखील करू नये कारण आजचा भारत हा चीनलाही जशास तसे उत्तर देण्यास सक्षम आहे चिननेही पाकिस्तानची बाजू लावून धरणे योग्य नाही कारण दहशतवादाच्या विरुद्धच्या या युद्धात भारताला अनेक देशांची साथ आहे जगातील सर्व प्रमुख देश भारताच्या बाजूने आहेत हे पाकिस्तानने विसरू नये पाकिस्तानने जर पुन्हा भारताची कुरापत काढली तर एक दिवस पाकिस्तान जगाच्या नकाशावरून गायब  होऊ शकतो याच भान पाकिस्तान ने ठेवावे असे माजी सैनिक संघर्ष समिती व परिवर्तन फाउंडेशनचे सचिव मेजर कृष्णा सरदार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा