नगर - समाजामध्ये आज प्रत्येकाला काही ना काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पण वयस्कर व त्यात पण विधवा महिलांच्या समस्या फार मोठ्या प्रमाणात आज निर्माण झाले आहे. त्यावर उपाय व त्यात पण विधवा ज्येष्ठांची मदत करण्याची आज अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन स्नेहालय बाल भवनचे हनीफ शेख यांनी केले.
अहमदनगर डिस्ट्रिक्ट मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने 100 विधवा महिलांना मदतीचे धनादेश हनीफ शेख यांच्या हस्ते मुस्लिम फाउंडेशनच्या कोटला येथील कार्यालयात वाटप करण्यात आले. याप्रसंगी फाउंडेशनचे इंजि. इकबाल सय्यद, डॉ. सईद शेख, हाजी मिर्झा आदी मान्यवर उपस्थित होते.
विधवांना मदतीचे उपक्रम अहमदनगर मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशन मागील सोळा वर्षापासून सलग राबवत आहे.
हनीफ शेख पुढे म्हणाले की आपल्या देशात विधवा व ज्येष्ठांचे भरपूर समस्या आहे. त्याकडे आपल्याला जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात घरच्याकडूनच ज्येष्ठांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्या बाबींचा उहापोह होत नाही व परिणामी ती व्यक्ती डिप्रेशन मध्ये जाते किंवा घरातून निघून जाते, आजारी पडते काहीही होऊ शकते म्हणून प्रत्येकाने आपल्या व समाजातील विधवा, ज्येष्ठांची देखभाल केली पाहिजे. त्यांच्याशी बोलत रहावे. त्यांची विचारपूस करायला हवी असे नमूद करून मुस्लिम फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. सूत्रसंचालन डॉ. सईद शेख यांनी केले. आभार हाजी मिर्झा यांनी मानले.
إرسال تعليق