तालुक्यातील नगर - मनमाड रोडवरील अस्तगांव फाटा (ता. राहाता) याठिकाणी शुक्रवार दि. ०२ मे २०२५ रोजी आरटीओ अधिकाऱ्यांतर्फे करण्यात येत असलेल्या वाहन तपासणी दरम्यान विरुद्ध लेनमध्ये एक दुचाकी आणी चार चाकी कार यांचा अपघात झाला असल्याचे लक्षात आपल्या ड्युटीवर उपस्थित असलेले श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाचे आरटीओ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्काळ मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली असता अपघातामध्ये एक महिला व एक पुरुष जखमी अवस्थेत आढळून आले, त्यांच्या डोके, पाठ व हाता पायाला गंभीर दुखापत झाली होती व कार चालक मात्र न थांबतच निघून गेला होता, यावर सहायक मोटार वाहन निरीक्षक हेमंत निकुंभ,समोवानी श्री. बनकर, वाहनचालक श्री.नागवे यांनी सदरील दोघाही अपघातग्रस्तांना आपल्या शासकीय वाहनात बसवले तथा वाहन चालक श्री.नागवे यांनी अपघातग्रस्त मोटारसायकल चालवून तत्काळ जखमींना राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याने अपघातग्रस्तांना मोठा दिलासा यासोबतच वेळेत उपचार मिळण्यास मोठी मदत झाली आहे.
अपघातसमयी मदत करावी असे उप प्रादेशिक परिवहन ( आरटीओ) कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी सांगण्यात येत आहे तसेच आरटीओ अधिकारी देखील वारंवार अपघातग्रस्तांची मदत करताना दृष्टीपथास येत आहेत.खरे तर सर्वांनीच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आल्यास अपघातग्रस्तांना वेळेत योग्य उपचार मिळण्यास मोठी मदत मिळून वेळप्रसंगी त्यांचे प्राण वाचवले जावू शकतात असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
Post a Comment