अहमदनगर - स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने हॉटेल रेडीयन्स येथे महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ सोहळा संपन्न झाला. यामध्ये शिल्पकार बालाजी भैरवनाथ वल्लाल यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदर्श शिल्पकार पुरस्कार देण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्रामभैय्या जगताप, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, शिल्पकार प्रमोद कांबळे,मारुतीराव मिसळवालेचे संचालक अमित खामकर,स्नेहबंधचे संस्थापक डॉ.उद्धव शिंदे आदी मान्यवर उपस्थितीत होते. बालाजी वल्लाल यांना त्यांच्या शिल्पकलेसाठी यापूर्वीही अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
विविध क्षेत्रात समाजहिताचे उल्लेखनीय काम करत असलेल्यांच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी स्नेहबंधच्या वतीने कला, क्रीडा, शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक या क्षेत्रातील मान्यवरांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
Post a Comment