वडाळा महादेव येथे वृक्ष भेट देऊन शिक्षकांचा सन्मान ! २३ वर्षानंतर मित्र - मैत्रिणी एकत्र ' स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय या ठिकाणी २००१ - २००२ इयत्ता दहावी बॅच या विद्यार्थ्यांनी अगदी इयत्ता पहिली पासून शालेय जीवन इयत्ता दहावीपर्यंत सोबत हसत खेळत रमत - गमत एकत्र जोपासले परन्तु दहावीनंतर मित्र - मैत्रिणी यांची भेट होणे दुर्मिळ झाली होती म्हणून येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच विमा प्रतिनिधी यांनी मोबाईल व्हाट्सॲप च्या माध्यमातून त्यांना एकत्र करत मित्रांचे वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र वेळेअभावी अनेकांची उत्सुकता यामध्ये कमी प्रमाणात असल्याने येथील ज्येष्ठ शिक्षक विकास राठोड तसेच गणेश कुसळकर यांनी एकत्र येत डॉ.मतीन शेख, सौ. छाया गायकवाड यांच्याशी चर्चा विनिमय करून गेट-टुगेदर स्नेह मेळावा या निमित्ताने सर्व  शालेय मित्र-मैत्रिणी यांना एकत्र करण्याचा निर्णय घेतला, यावरून सर्व शिक्षक वृंद तसेच सर्व मित्र-मैत्रिणी यांना याबाबत माहिती देऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  यावेळी शाळेतील वर्ग पुन्हा भरविण्यात आला तसेच प्रसंगी जुन्या आठवणींना उजाळा देत शालेय वर्गाचे सुशोभीकरण करण्यात आले होते. 
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मतीन शेख यांनी केले तर सूत्रसंचालन सौ. छाया गायकवाड, ज्येष्ठ शिक्षक विकास राठोड सर यांनी केले.
यावेळी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले, प्रसंगी गुरुजन वर्ग, मान्यवर यांचा वृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला तसेच दिवंगत शिक्षक व्यवहारे मॅडम, लचके सर, बनकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
 या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे सर्वश्री मुख्याध्यापक .डी.एन. माळी, माजी मुख्याध्यापक मोहन सर, माजी ज्येष्ठ शिक्षक के. बी. वमने, मा. शेख सर, दवंगे सर, खरात सर, खर्डे सर, बेल्हेकर सर,  काळे सर, श्रीमती शेख मॅडम, बाळासाहेब कसार, प्रशांत बांडे,संदीप जाधव, आदि शिक्षक यावेळी उपस्थित होते.
सर्वानुमते उपस्थित माजी विद्यार्थी यांना शुभेच्छा देऊन भविष्यात आरोग्य याविषयी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.  
 या कार्यक्रमासाठी  हायकोर्ट न्यायालयीन कर्मचारी अमोल राऊत, उद्योजक महेश महाले, किशोर गायकवाड, पवन गायकवाड, इंजि.संदीप कदम, निलेश पवार, उद्योजक सुरेंद्र होळकर, पुंडलिक देंडगे, संतोष शिंगटे,  बाळासाहेब अनारसे, डॉ. योगेश कसार, उद्योजक महेश मैड,महसूल अधिकारी सुजित कसार, डॉ. मतीन शेख, ग्रामविकास अधिकारी हितेश ढुमने, प्रगतशील शेतकरी महेश जोशी,अब्दुल सय्यद, गणेश गायकवाड, भीमराव बुलबुले, नितीन गायकवाड, रामनाथ सोनवणे अविनाश चौधरी, सतीश कुलकर्णी, माजी  ग्रामपंचायत सदस्य प्रफुल पवार, विनायक राऊत, नवनाथ गुंड, सौ. कविता कसार, छाया गायकवाड, प्रतिभा जेजुरकर, मीनाक्षी गायकवाड, चित्रा कसार, मनीषा कसार,सुवर्णा पोकळे, मनीषा गायकवाड, स्वप्नाली काळे आदी या कार्यक्रमासाठी प्रयत्नशील होते .विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तसेच उच्च पद भूषविलेले माजी शालेय विद्यार्थी यांचा मान्यवरांचा हस्ते सन्मान करण्यात आला.
 सदरचा आगळावेगळा कार्यक्रम पाहून मित्र - मैत्रिणी यांचे मन भारावून गेले अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करून यशस्वी जीवनाची माहिती यावेळी विशद केली. स्नेहभोजन यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान तसेच ग्रा.प. सदस्य प्रफुल्ल पवार, इंजि.संदीप कदम, विमा प्रतिनीधी गणेश कुसळकर, ज्येष्ठ शिक्षक विकास राठोड यांनी आभार मानत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई
वडाळा महादेव 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा