अहमदनगर मुस्लिम वेल्फेअर फाऊंडेशन कडून गरजु विधवा महिलांना आर्थिक मदत... मुस्लीम फाऊंडेशनचे वंचित व दुर्बलांसाठी केलेले कार्य अनुकरणीय - शांताराम राऊत

अहमदनगर / प्रतिनिधी:
समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या "अहमदनगर मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशन" ने एक अनुकरणीय पाऊल उचलले आहे. संस्थेच्या वतीने शहरातील अनेक गरजू विधवा महिलांना आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे गरजूंना नवा आत्मविश्वास मिळाल्याचे चित्र आहे. या सामाजिक उपक्रमाचे अनेकांनी खुलेपणाने स्वागत केले असून इतर संस्थांसाठीही ही एक प्रेरणादायक कृती ठरली असल्याचे प्रतिपादन निसर्ग लाॅन औरंगाबादचे संचालक व नाभिक संघटना महाराष्ट्र चे अध्यक्ष शांताराम राऊत यांनी केले. 
           अहमदनगर डिस्ट्रिक्ट मुस्लिम वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने  विधवा महिलांना मदतीचे धनादेश निसर्ग लाॅन औरंगाबादचे संचालक व नाभिक संघटनेचे अध्यक्ष शांताराम राऊत यांच्या हस्ते मुस्लिम फाऊंडेशनच्या कोटला येथील कार्यालयात वाटप करण्यात आले. यावेळी अहमदनगर मुस्लिम वेल्फेअर फाऊंडेशनचे संस्थापक व्यवस्थापक व माजी उपनगराध्यक्ष हाजी नजीरभाई,अध्यक्ष डॉ. सईद शेख, सेक्रेटरी मुबीन तांबटकर, ट्रस्टी हाजी मिर्झा, इंजि. इकबाल सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. 
या विशेष कार्यक्रमात प्रत्येक गरजू लाभार्थी महिलेला मदतीचे धनादेश सुपूर्त करण्यात आले. मदतीसोबत महिलांना आत्मनिर्भरतेच्या दिशा दाखविणारे मार्गदर्शनही देण्यात आले.
पुढे बोलताना शांताराम राऊत म्हणाले की, या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे की मुस्लिम फाऊंडेशनने गरजू विधवा महिलांना प्राधान्य दिले आहे. महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरणाचे ध्येय मुस्लिम फाऊंडेशनचे असुन "विधवा महिलांसाठी ही मदत फक्त रक्कम नसून त्यांना जगण्याची नवी उमेद देणारी प्रेरणा आहे असे सांगितले.
समाजातील प्रत्येक घटक सुरक्षित आणि सन्मानाने जगावा हेच आमचे ध्यैय आहे.असे मुस्लिम फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.सईद शेख यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुबीन तांबटकर यांनी केले. तर हाजी मिर्झा यांनी आभार मानले. वृत्त विशेष सहयोग, ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा