उत्तर नीट वाचून समजून घ्या.
लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता
भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य म्हणजे विविधता. भाषिक, भौगोलिक ,धार्मिक, सांस्कृतिक, अन्न-वस्त्र , घरांची बांधणी, शेतीची पिक अगदी सगळ्याच बाबतीत असणारी विविधता.
प्रमुख सहा धर्म आणि त्याचे ढिगानी असणारे पंथ उपपंथ.
१९४७ च्यापूर्वीपर्यंत एखाद राज्य किंवा भूभाग राजाने जिंकला कि त्याचा धर्म तोच राज्याचा धर्म. राजा बदलला कि सगळ बदलल.
लोकशाही म्हणजे आपले प्रतिनिधी लोक निवडून देतात आणि लोकांच्या वतीने हे प्रतिनिधी सरकार चालवतात.
जर वेगवेगळ्या धर्म पंथाचे लोक देशात असतील तर त्यांना देशातल सरकार आपल वाटाव , त्याच्याकडून सारख्या वागणुकीचा आणि संधीचा विश्वास मिळावा हि अपेक्षा चूक नाही.
तशी व्यवस्था करायची म्हटली तर देशाच सरकार, प्रशासन, कार्यपालिका, न्यायपालिका ,स्वायत्त संस्था आणि सुरक्षा दल धर्मनिरपेक्ष असणे अनिवार्य आहे.
मात्र त्याच वेळेला देशातल्या नागरिकाला व्यक्ती म्हणून आपापली उपासना पद्धती, धार्मिक असणे किंवा नसणे आणि हव्या त्या धर्माचे आचरण करण्याची मुभा असावी.
सगळ्यांना असणार मुलभूत स्वातंत्र्य आणि हक्क एकसमान आहेत म्हणूनच नागरिकांनी आपली कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडली पाहिजे.
यामध्ये इतर कोणत्याही नागरिकाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे अपेक्षित आहे.
हि सगळी व्यवस्था नीट पाहिली ,समजून घेतली तर एक गोष्ट समजते.
निकोप लोकशाहीसाठी देशाच धर्मनिरपेक्ष असण हि पूर्वअट आहे.
तुम्हाला धर्मनिरपेक्ष तत्व नाकारायच असेल तर आपोआपच लोकशाहीमध्ये असणारे सगळे हक्क आणि स्वातंत्र्य तुम्ही नाकारता कारण तुम्ही लोकशाही नाकारता.
एकदा लोकशाही नाकारली कि तुमच्यावर कोण राज्य करणार आहे आणि तुमच्या भविष्याचे निर्णय कोण घेणार आहे हे ठरवण्याचा तुमचा हक्क संपला.
एकदा लोकशाही नाकारली कि तुमच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात दाद मागण्याचा हक्क संपला.
एकदा लोकशाही नाकारली कि तुम्हाला सत्तेला ,सरकारला प्रश्न विचारण्याची संधी संपली.
कुठलीही शासनव्यवस्था कधीही संपूर्ण निर्दोष आणि आदर्श असू शकत नाही ना कुठला देश ना समाज ना व्यक्ती.
मात्र जास्तीत जास्त चांगली व्यवस्था आपल्या देशात निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हा मात्र सगळ्यांचा हक्क आणि जबाबदारी सुद्धा.
आता एकधर्मीय राष्ट्राचे समर्थन करायचे, धर्मनिरपेक्ष व्यवस्था नाकारायची कि नाही हा निर्णय तुमच्या खांद्यावर काय आहे त्यावर अवलंबून.
आनंद शितोळे
#रविवारची_पोस्ट
#आपल्या_धडावर_आपलेच_डोके
#लोकशाही_धर्मनिरपेक्षता
إرسال تعليق