शाहू महाराज हे खरे परिवर्तनाचे अग्रेदूत - विजयराव खाजेकर

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
नव स्वराज्य सेनेच्या वतीने छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती आझाद मैदान श्रीरामपूर या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी नव स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजयराव खाजेकर यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येवून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिवादन केले. याप्रसंगी बोलताना विजयराव खाजेकर म्हणाले की, शाहू महाराज यांच्या दृष्टिकोनात मानवता हा धर्म होता. शैक्षणिक धोरणातून त्यांनी कोल्हापूर संस्थानात सर्व जाती-धर्मातील मुला - मुलींसाठी शाळा सुरू केल्या शिष्यवृत्ती, निवासी विद्यालय, सुलभ प्रवेश, वस्तीगृहे हे सर्व त्यांच्या प्रगत धोरणाचे भाग होते .धर्माच्या आधारावर शिक्षणाला बंदी घालणाऱ्या प्रवृत्तींना त्यांनी स्पष्ट विरोध केला, शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे साधन आहे ही त्यांची ठाम भूमिका होती म्हणून छत्रपती शाहू महाराज हे खरी परिवर्तनाचे अग्रदूत असल्याचे श्री.खाजेकर म्हणाले.
याप्रसंगी रंगनाथ पितळे, दत्तात्रय शिरसाठ, दादू (मास्तर) खंडागळे, कारभारी जाधव, विकास ढोकचौळे, संतोष मिरपगार ,राजेंद्र राठोड, प्रभाकर साळवे , सागर बागुल, बबन जाधव, विल्सन दुशिंग, डॅनी शिंदे , अनिल वाघमारे, अजय  गायकवाड आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा