येथील हिंद सेवा मंडळाच्या क. जे. सोमैया हायस्कूल मध्ये महाकवी कालिदास दिन व राजर्षी शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भागवताचार्य सचिन जोशी, प्रमुख पाहुणे वैशाली जोशी, विद्यालयाचे चेअरमन रणजीत श्रीगोड, शालेय समिती सदस्य किशोर फुणगे, कारभारी कान्हे, विद्यालयाचे मुख्याध्यापक भूषण गोपाळे, पर्यवेक्षक कल्याण लकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महाकवी कालिदास, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.
चि. वल्लभ भुजाडी, वेदांत जोशी, श्रीकृष्ण वाघमोडे, सुमीत आमले, असद शेख, जिवेश जोगदंड यांनी कालिदास दिन, राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती आपल्या भाषणातून सादर केली. विद्यालयातील संस्कृत विषय शिक्षिका मंजिरी काटकर यांनी महर्षी कालिदास रचित सुभाषितं, श्लोक, संस्कृत प्रार्थना विद्यार्थ्यांकडून पठण करून घेतले.
विद्यालयाचे चेअरमन रणजित श्रीगोड यांनी आपले मनोगतात शाहू महाराज यांनी आधुनिक शिक्षण पद्धतीला महत्वाचे स्थान दिले होते, तसेच कालिदास दिनाचे महत्व विशद केले.
अध्यक्षीय भाषणात सचिन जोशी यांनी संस्कृत एक प्राचीन भाषा असुन समृद्ध अभिजित शास्त्रीय भाषा आहे. सर्व भाषांची जननी संस्कृत भाषा आहे. संस्कृत भाषा सर्वांनी शिकली पाहिजे . या भाषेचा प्रचार विकास झाला पाहिजे . संस्कृत भाषेचे सर्वांनी ज्ञान अवगत करावे. संस्कृत भाषा विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळतात. संस्कृत हि गुण देणारी भाषा असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंजिरी काटकर, सुत्रसंचालन दिनेश मुळे, आभार ज्योती फुलवर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाबा वाघ, रमेश धोंडलकर, अनिल चोभे, विनायक चितळकर, संकेत गंधे यांसह सर्व अध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशिल होते.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
إرسال تعليق