क्रांतीदीप नव्या पिढीसाठी प्रेरणादायी - पद्मश्री पोपटराव पवार क्रांतीदीप पुस्तकाचे प्रकाशन.

नगर (प्रतिनिधी) :*परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणारे अतिशय कमी राहिलेले असून ध्येय आणि निष्ठेने काम करणाऱ्या जुन्या पिढीतील कॉ.बाबा आरगडे हे सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीमध्ये कार्यरत असलेल्या अनेकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं काम करत आहेत, कॉ. आरगडे  त्यांचे हे काम पुढच्या पिढीला कळावं या दृष्टीने क्रांतीदीप कॉम्रेड बाबा आरगडे यांचे कार्य नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना आदर्श घेण्यासारखे आहे,* असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.
   डाव्या आणि पुरोगामी चळवळीमध्ये कायम अग्रेसर असलेले, हमाल पंचायत व अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या कार्याला वाहून घेतलेले कॉ. बाबा आरगडे यांच्या बद्दल विविध संस्था व संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी लिहिलेल्या "क्रांतीदीप : कॉ.बाबा आरगडे" या पुस्तकाचे प्रकाशन हमाल पंचायत भवन मध्ये जि. प.चे माजी अध्यक्ष अरुण कडू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच संपन्न झाले,त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विचारपिठावर आ. संग्रामभैया जगताप, हमाल पंचायत चे अध्यक्ष अविनाश घुले, अ. नि. स.चे अविनाश पाटील, ज्ञानदेव पांडुळे,सुधीर टोकेकर, संजय खामकर, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी इ. मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी पुढे बोलताना पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, कॉ.बाबा आरगडे हे चालतं बोलतं व्यासपीठ असुन अनेक चळवळींचे ते मार्गदर्शक आहेत, त्यामुळे क्रांतीदिप हे नाव या पुस्तकासाठी सार्थ ठरत आहे. 
अविनाश पाटील म्हणाले की, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ वाढवण्यासाठी आणि तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कॉ. बाबांचे सहकार्य लाभलेले आहे. 
ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, पुरोगामी विचार सांगण्या बरोबरच जगण्याचे ही धाडस बाबांनी दाखवलेले आहे,त्यामुळे ते चळवळीतील कार्यकर्त्यांचे आदर्श आहेत. 
हमाल पंचायत चे अध्यक्ष अविनाश घुले यावेळी बोलताना म्हणाले की, शंकरराव घुले अण्णांच्या नंतर हमाल पंचायत ला मार्गदर्शन करणारे नेतृत्व म्हणजे बाबा. कोणताही लढा लढण्यासाठी बाबा च्या वैचारिक उंचीचा फायदा चळवळीला होतो.  त्यामुळेच हमाल पंचायत चे काम आम्ही अण्णांच्या नंतर पुढे नेत आहोत. 
अध्यक्षपदावरून बोलताना अरुण कडू पाटील म्हणाले की, प्रगतिशील विचारांच्या कार्यकर्त्यांची एकजूट निर्माण करण्याचे काम कॉम्रेड बाबा यांनी केलेले आहे, जेष्ठ पासून तर  नवोदिता पर्यंत बाबांचा संपर्क दांडगा आहे. सर्वच क्षेत्रात त्यांचे योगदान असल्याने क्रांतीदीप कॉम्रेड बाबा आरगडे  नाव सार्थ आहे. शब्दगंध चळवळीने पुढाकार घेऊन प्रकाशित केलेले क्रांतीदिप कॉ. बाबा आरगडे गौरव ग्रंथ नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. 
यावेळी शाहीर भारत गाडेकर यांनी भलरी गीत गाऊन कार्यक्रमास ची सुरुवात केली. यावेळी बापूसाहेब भोसले, माजी प्राचार्य डॉ.जी पी ढाकणे,सुभाष सोनवणे प्रा.डॉ. अशोक कानडे, ॲड.रंजना गवांदे,अशोक सब्बन, कॉ. आनंद लोखंडे, हरिभाऊ नजन, चिलेखनवाडी चे सरपंच भाऊसाहेब सावंत, प्राचार्य डॉ,अशोक ढगे, डॉ अशोक दौंड, आनंदा साळवे, भगवान राऊत, राजेंद्र फंड,बबनराव गिरी, पॉल भिंगारदिवे, बी के चव्हाण सौंदाळ्याचे सरपंच शरद आरगडे, कॉ. भारत आरगडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री शर्मिला गोसावी यांनी केले तर शेवटी संजय महापुरे यांनी आभार मानले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा