मांजरी बु. सह पुणे महानगर पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांना पुणे महानगरपालिकेने सातत्याने विकासा पासून वंचित ठेवले आहे. येथील मिळकत धारकांना ४०% मिळकत कर सवलतीचे व विकासाचे गाजर दाखवून, प्रत्यक्षात मात्र करावर २% सावकारी व्याज दंड लावून महायुती सरकार व पुणे महानगरपालिका प्रशासन नागरिकांची लूट करत आहे.
या लुटीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात "गाजर व रताळी आंदोलन" करण्यात आले.
पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे येथे करण्यात आलेल्या या आंदोलनात पुणे मनपा प्रशासन व महायुती सरकार यांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी महायुती सरकार व पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या निषेधच्या घोषणांनी संपूर्ण महानगर पालिका परिसर दणाणून गेला होता.
या आंदोलनास प्रशांत जगताप, रवींद्र माळवदकर, उदय महाले, आशाताई साने, गजेंद्र मोरे, किशोर कांबळे, वैशाली थोपटे, दिलशाद अत्तार, पूजा काटकर, रमिझ सैय्यद, असिफ शेख, गणेश नलावडे उपस्थित होते.
إرسال تعليق