भिंगार - आपल्या गुरूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजात आपलं स्थान निर्माण करावे असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुळे यांनी केले.
श्रीमती अॅबट मायादेवी गुरुदित्ता शाह हायस्कूल भिंगार या ठिकाणी गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात आलेल्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद तोरणे होते. प्रारंभि प्रमोद मुळे, गणेश दाणी,रमेश वराडे,सुनील तरवडे,श्रीपाद मुंगी,शिवप्रसाद काळे, राम घुले, विद्यालयाचे प्राचार्य तथा उत्तर विभागीय सहाय्यक अधिकारी प्रमोद तोरणे, मुख्याध्यापक नारायण अनभुले पर्यवेक्षिका कविता शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन संपन्न झाले.आमदार आशुतोष काळे यांचे नगर कार्यालय प्रमुख गणेश दाणी यांनी विद्यार्थ्यांना आपला देश,आई-वडील,गुरु यांना कधीही विसरू नये तरच जीवनाला अर्थ आहे हे समजून सांगितले.स्वामी विवेकानंद ट्रस्ट भिंगार यांच्या वतीने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. प्रास्ताविकामध्ये विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद तोरणे यांनी विद्यार्थ्यांकडून गुरुदक्षिणा म्हणून जीवनात कधीही व्यसन करणार नाही ही शपथ घेतली. यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या भाषणानंतर व्यासपीठा वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण संपन्न झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मजा सुरकुटला यांनी केले. तर आभार गणपत करवते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
إرسال تعليق