गुणवत्ता टिकवायची असेल तर शिस्त ही सवय बनावी: आमदार आशुतोष काळे

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
कोणतेही क्षेत्र असो शिस्तीत केलेले प्रत्येक कार्य हीच खरी गुणवत्ता आहे. गुणवत्तेमुळे यश मिळते आणि शिस्तमुळे ते टिकते. शिस्त ही गुणवत्तेची खरी ओळख आहे. मग ती स्वयंशिस्त असेल तर उत्तमच ! 
शिस्तीच्या मार्गावरूनच गुणवत्तेच्या शिखराकडे जाता येते व हा मार्ग आपणांस कर्मवीर अण्णा यांनी शिकवला,रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय सल्लागार समितीचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी अहिल्यानगर येथील रयत च्या मुख्याध्यापक व प्राचार्यांच्या सहविचार सभेत गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत शिस्त फारच महत्त्वाची असते असे प्रतिपादन केले.
रयत शिक्षण संस्था, उत्तर विभाग अंतर्गत विभागीय शाखाप्रमुख सहविचार सभा दिनांक २६ जुलै रोजी २०२५ रोजी अहिल्यानगर मध्ये प्रेरणादायी वातावरणात पार पडली. 
या बैठकीला आमदार आशुतोष काळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, राहुलदादा जगताप, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, कार्यालयीन प्रमुख राजनंदन पांडुळे तसेच महाविद्यालयांचे प्राचार्य यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाची सुरुवात सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत करून केली. त्यानंतर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात विभागातील शैक्षणिक, भौतिक व मूलभूत सुविधा याबाबत सविस्तर माहिती दिली. शालेय स्वच्छता, स्पर्धा परीक्षा, प्रवेश,शिक्षकांची रिक्त पदे, शाखा अडचणी, भौतिक सुविधा इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड व एआय संदर्भात प्रत्येक बाबीची माहिती दिली.
  रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या कल्पनेतून व मा. चेअरमन यांच्या कुशल प्रशासनातून नवनवीन शैक्षणिक तंत्रज्ञान अध्यापनात वापरले जात आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आधारित इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड यंत्रणेचा प्रभावी उपयोग, प्रशिक्षण आणि देखभाल करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.
गुणवत्ता सुधार कार्यक्रम विद्यार्थी प्रगती, शिकविण्याच्या पद्धती, शिक्षकांचे प्रशिक्षण, निकाल यामध्ये सुधारणा करण्याचे उपाय संस्थेने राबवले जात आहेत.
विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे म्हणाले,
शाखांसमोर अनंत अडचणी  आहेत. शाळांमधील अडचणींची नोंद, उपाययोजना व मागण्या विभागीय पातळीवर केल्या जात आहेत.
घटती विद्यार्थी संख्या प्रवेश वाढविण्यासाठी प्रयत्न, पालक संवाद आणि विद्यार्थ्यांशी संवाद वाढवणे.
यावर एकच उपाय म्हणजे गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
बैठकीत मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राहुलदादा जगताप यांनी अध्यक्ष शरदचंद्र पवार, चेअरमन चंद्रकांत दळवी व सचिव विकास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या गुणवत्ता सुधार कार्यक्रमाचे आपण फॉलोअर्स आहोत व संस्थेने सर्वतोपरी सहकार्य व मदत केली आहे असे स्पष्ट करत संस्थेच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
सभेच्या समारोपात आमदार आशुतोष काळे यांनी शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत असा संदेश दिला. विद्यार्थी टिकले तर संस्था पण टिकेल व ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शैक्षणिक शिस्तीसाठी प्रसंगी वाईटपणा घेण्याची तयारी शाखाप्रमुखांनी ठेवली पाहिजे. शंका समाधान व अडिअडचणी यावर चर्चा झाली. विभागीय गुणवत्ता मार्गदर्शकांनी आभार प्रदर्शन केले.

*वृत्त विशेष सहयोग*
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा