विजेचा धक्का बसूनही सुखरुप वाचलेले वायरमन अनिल दौण्ड यांचा सत्कार !

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी ? याची प्रचिती महावितरणचे लाईनमन वायरम अनिल दौण्ड यांना आली. श्री. दौण्ड हे तालुक्यातील बेलापूर, ऐनतपूर, वळदगांव, उंबरगांव या भागात महावितरण (मराविमं)  कंपनी चे काम पहातात उंबरगांवचे एका वीज डीपीवर जंक कट झाला होता, ते वीज प्रवाह खंडीत करून वीजेच्या खांबवर चढले आणी जंक जोडला व अंतिम जोड पहात असतांना त्यांना अचानक वीजेचा झटका बसला ते खांबावरून कोसळून त्यांचा पाय डीपीचे अगलला अडकल्याने तिथेच ते लटकले, खाली उभे असलेले शेतकरी घाबरले कोणीही वर जाण्याची हिंमत करत नव्हते, तातडीने त्यांच्या मुलाला व मरावीज कंपनीचे अधिकारी चव्हाण व वाणी यांना संपर्क करण्यात आले. लोकं जमा होई पर्यंत वायरम अनिल दौण्ड बेशुद्ध झालेले होते, त्यांना तातडीने खाली काढून रुग्णालयात नेण्यात आले त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले, रात्री ११-३० च्या सुमारास ते शुध्दीवर आले आणी डॉक्टरांनी सुद्धा सांगीतले की देवतारी त्याला कोण मारी ? हेच खरे आहे. काहीदिवस ते रुग्णालयात उपचार घेवून आज आपल्या कामावर हजर झाले असून पवित्र श्रावण माहिन्याचा पहिल्या दिवशी त्यांनी शिवशंकर मळ्यात श्री महाकाल कोळेश्वर महादेवाचे दर्शन घेतले तेव्हा दौण्ड म्हणाले मला महादेवानेच वाचवले, ही चांगल्या कामांची पुण्याई आहे, आज त्यांचा जीव वाचल्याबद्दल वायरमन अनिल दौण्ड यांचा शाल,श्रीफळ,टोपी देऊन सत्कार करतांना ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे यांच्या समवेत सचिन शेटे,संकेत उंडे उपस्थित होते.

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा