एक पेड माँ के नाम संकल्पनेतून दुर्गादास शेगेकर यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
भारतीय जनता पार्टीच्या "एक पेड माँ के नाम" या प्रेरणादायी संकल्पनेतून भाजप किसान मोर्चाचे वरुड (जि.अमरावती) शहर अध्यक्ष दुर्गादास शेगेकर यांचा वाढदिवस लहान न्यू इंग्लिश स्कूल, वरुड (जि.अमरावती) येथे अत्यंत अनोख्या आणि सामाजिक उपक्रमांनी भरलेल्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
या विशेष प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांच्या छोट्या हातांनी वृक्षारोपण करण्यात आले. "आईच्या नावे एक झाड" ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवून निसर्गसंवर्धनाचा महत्वाचा संदेश देण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
दुर्गादास शेगेकर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने वाढदिवसाचे औचित्य समाजहिताच्या दिशेने वळवले. निसर्गरक्षण, शिक्षणप्रेम आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेला हा उपक्रम उपस्थितांनी विशेष उल्लेखनीय ठरवला.
कार्यक्रमाला प्रामुख्याने संजय उर्फ योगेश्वर खासबागे डॉ निलेश बेलसरे देवेन्द्र खेरडे मुरलीधर पवार राजु सुपले आकाश भोजने निलेश मानकर  न्यु इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका कोमल पांडव व शाळेतील शिक्षकवृंद, पालक, भाजपा कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन योगेश्वर खासबागे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुरलीधर पवार यांनी केले.

*वृत विशेष सहयोग*
 पत्रकार प्रविण सावरकर
 वरुड जि.अमरावती

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा