वरुड (जि.अमरावती) तालुक्यातील संत्रा मृग बहाराच्या बागांना अवकाळी पावसाचा आणि 'डायबॅक' रोगाचा जबर फटका बसला असून, अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी अखिल माकोडे यांच्या नेतृत्वात मौजा जामगांव, खडका, बारगांव, तलोटी, कुमंदरा, नागझरी, पाळसोना, बेनोडा ,गोरेगांव, पांडरघाटी,मानिकपुर, माघोना, येथील सर्व शेतकऱ्यांकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात शेतकऱ्यांनी संत्रा बागांवर झालेल्या नुकसानाची तात्काळ पाहणी करून शासन स्तरावरून आर्थिक मदत व सानुग्रह अनुदान मिळवून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे बहरलेल्या झाडांची फळधारणा कमी झाली असून, 'डायबॅक' रोगामुळे अनेक झाडे सुकून चालली आहेत. त्यामुळे बागायती शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.
निवेदन देताना परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.यावेळी अखिल माकोड़े,प्रीतम गावंडे , राहुल फुले, विलास नींबुरकर, राजू जोशी, सुमित गुर्जर, विलास पाटिल प्रफुल्ल गावंडे, घनश्याम सोनारे , पुरुषोत्तम पटोले, बाळाभाऊ गोहाड, धीरज बारस्कर,विनोद शिवारे, संजय गायकी, खुशाल ठाकरे,अनिल लोखंडे, आकाश माकोडे, लीलाधर बारस्कर, स्वप्निल गावंडे आदि उपस्थित होते.
*वृत विशेष सहयोग*
पत्रकार प्रविण सावरकर
वरुड जि.अमरावती
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
Post a Comment