रत्नप्रभा फॅसिलिटी सर्व्हिसेस एलएलपी व श्रीगोंदा नगर परिषदेने घेतला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चा धसका उपोषणा अगोदरच सर्व मागण्या मान्य लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे - निलेशभाऊ गायकवाड



नगर - काही दिवसांपूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) दिपक भाऊ निकाळजे (राष्ट्रीय अध्यक्ष) यांच्या आदेशानुसार निवेदन देण्यात आले होते. निवेदनात म्हंटले होते की रत्नप्रभा फॅसिलिटी सर्व्हिसेस एलएलपी व श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये आरोग्य विभागात घनकचरा कर्मचारी संघटनेचे वतीने सदरील कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या पगार व पी.एफ.चा तपशील प्रतिमहा मिळावा, पगार प्रत्येक महिन्यात वेळेवर मिळावा, पगार मध्ये वाढ करण्यात यावी, सर्व कर्मचारी यांच्या आवश्यकतेनुसार सेफ्टी किट देण्यात यावे, आणि थकीत पगार तत्काळ मिळावा, आठवड्यातून एक दिवस पगारी सुट्टी मिळण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड  
अक्षय लगाडे, संदीप घोडके, विकास शिंदे, शुभम आठवले, मयूर घोडके, नागेश उमाप, आपला काळे, कृष्णा ससाने, आरती घोडके, कांचन घोडके, आशा नरवडे, विजय माला घोडके, पल्लवी घोडके, अक्षरा घोडके आदी उपस्थित होते.
सदरील संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी यांच्याशी केलेल्या चर्चेमधून सकारात्मक मार्ग काढलेला आहे. यावेळी श्रीगोंदा नगर परिषदेनी आम्हाला पत्र द्वारे सांगितले की विभाग प्रमुख यांच्याशी या विषयावरती चर्चा करूनं योग्य ती कार्यवाही करू व कर्मचारी साप्ताहिक सुट्टी देण्यात येईल सुट्टी बाबत कर्मचारी ठेकेदार व नगरपालिका यांच्यासोबत बसून कधीपासून करायचा याचा निर्णय घेऊ, तरी वरील नमूद केल्याप्रमाणे आम्ही आपणास या पत्राद्वारे सर्व गोष्टीवरती सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही देतो.
याच पत्राला उत्तर म्हणून नगरपरिषद श्रीगोंदा व संबंधित कंत्राटदाराने या मागण्यांची  पूर्तता  पुढील सात दिवसात  केली नाही तर पुन्हा हे उपोषण करण्यात येईल अशा अटी शर्तींचे पत्र माननीय जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आले व आजचे उपोषण तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा