पंडित नेहरू हिंदी विद्यालयात किल्ल्यां वरील ठाकुरदास परदेसी यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित

नगर - युनेस्कोने नुकतेच महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूतील १ किल्ल्यांचा  समावेश जागतिक वारसा स्थळ यादीत केला आहे. याचे औचित्य साधून पंडित नेहरू हिंदी  विद्यालयात एकूण १२ किल्ल्यां वरील छायाचित्रांचेप्रदर्शन आयोजित केले आहे.
आजही ३५० वर्षानंतर छ. शिवाजी महाराज आणि त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे सर्व किल्ले यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते. यामुळे जगामधील अनेक देशांना छ. शिवाजी महाराजांचा पराक्रम नव्याने माहिती होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, लोहगड, साल्हेर, खांदेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग व तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. 
अहिल्यानगरमधील   ठाकूरदास परदेशी यांच्या नजरेतून विविध अंगांनी काढलेले हे फोटो अत्यंत आकर्षक आहेत. येत्या शुक्रवार दिनांक 15/08/2025 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत पंडित नेहरू हिंदी विद्यालय , एल.आय.सी. ऑफिस जवळ, किल्ला मैदान, अहिल्यानगर येथे छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन सर्वांसाठी मोफत  राहणार आहे. तरी शिवप्रेमी नागरिकांनी हे प्रदर्शन पाहण्यास विसरू नये अशी विनंती  शाळेतर्फे करण्यात आली आहे.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा