अहिल्यानगर – "अभिमान आणि नशीब आहे की, आपल्याला भारतभूमीवर जन्म मिळाला. आपल्या वीरांच्या रक्ताच्या थेंबांनी या भूमीला स्वातंत्र्याचे सोनेरी किरण लाभले. जसे आपण इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झालो, तसेच आता भ्रष्टाचारमुक्त, समृद्ध आणि सशक्त भारत घडवूया," अशा भावना व्यक्त करत पत्रकार जहीर सय्यद (संपादक, आलमगीर न्युज लाइव्ह 24) यांनी देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत प्राण अर्पण करणाऱ्या अमर शहीदांना नमन करताना, त्यांनी सर्व नागरिकांना एकतेचा, प्रामाणिकपणाचा आणि निःस्वार्थ देशसेवेचा संकल्प करण्याचे आवाहन केले. "स्वातंत्र्य दिन फक्त तिरंगा फडकवण्याचा दिवस नाही, तर तो आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या आणि बलिदानाची किंमत याची जाणीव करून देणारा पवित्र दिवस आहे," असे ते म्हणाले.
या शुभेच्छांमध्ये आलमगीर न्युज लाइव्ह 24 परिवारातील सर्व पदाधिकारी, संपादक, उपसंपादक, कार्यकारी संपादक, व्हाइस मेकर, तालुका व जिल्हा प्रतिनिधी, लेखक आणि सर्व सदस्य सहभागी झाले. सर्वांनी मिळून देशाच्या विकास, स्वच्छ प्रशासन आणि सामाजिक ऐक्यासाठी अखंड कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
إرسال تعليق