अहमदनगर : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 15 ऑगस्ट 2025 ला आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन हा दारुल उलूम रज़ा ए मेहबूब येथे ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.
यावेळी मदरसातील विद्यार्थ्यांनी स्वच्छ गणवेश परिधान करून मोठ्या उत्साहात हातातील तिरंगा दिमाखात फडकवून तसेच राष्ट्रीय पुरूषांच्या व भारत देशाचे जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. तद्नंतर मदरसाच्या मुख्य मैदानावर चकलंबा शरीफचे हज़रत मेहबूब मियाँ कादरी साहेब यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छापर मार्गदर्शन केले व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्व समाजातील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान विषद केले.
त्यांनतर येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय देशप्रेमावर आधारित गीत तसेच तुबा तहेनूर शेख या विद्यार्थीनीने इंग्रजी भाषेत भाषण केले. शेवटी संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांमध्ये मिठाई वाटपाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
याप्रसंगी काँग्रेसचे युवा नेते, नेहरू युवा पुरस्कार विजेते अन्वर सय्यद,अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष अतहर खान, शहराध्यक्ष अल्तमश जरीवाला, काँग्रेस पक्षाचे मोहम्मद मुबीन वलीयोद्दीन शेख, मखदुम सोसायटीचे अध्यक्ष पत्रकार आबिद खान, मुस्कान फौंडेशनचे अध्यक्ष शफाकत सय्यद, सय्यद फौंडेशनचे अध्यक्ष साहिल सय्यद, आलमगीर न्यूजचे संपादक जहीर सय्यद, सय्यद सिद्दीकभाई, अरबाज़ बागबान, रेहानभाई रिक्षावाले तसेच खत्मे कादरीया ग्रूपचे सर्व सदस्यसह मुकुंदनगर भागातील काही ज्येष्ठ नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे विश्वस्त खलिफा ए मन्सूरे मिल्लत पीरे तरिकत हजरत हाजी शेख बाबर चाँद कादरी रज़वी मेहबूबी रब्बानी, शेख नदीम कादरी रजवी, शेख रफिकभाई केडगाव, सय्यद अलीमुद्दीन, शेख अब्दुल कादिर भाई, शेख तहनूर कादरी, मौलाना शाहीद कादरी रज़वी साहब, मौलाना फैय्याज़ कादरी राज़वी साहब, हाफिज़ ओ कारी मेराज कादरी रज़वी साहब सह इत्यादींनी प्रयत्न केले.
إرسال تعليق