नगर शहरात खळबळ ! पुरातन घोडेपीर दर्याची तोडफोड !! आरोपी, सूत्रधार शोधा - एमआयएमचे डॉ.परवेज आशरफी यांची मागणी

नगर शहरात खळबळ ! 
पुरातन घोडेपीर दर्याची तोडफोड !! आरोपी, सूत्रधार शोधा -  एमआयएमचे डॉ.परवेज आशरफी यांची मागणी

नगर - नगर शहरात खळबळ ! पुरातन घोडेपीर दर्याची तोडफोड !! आरोपी, सूत्रधार शोधा.

एमआयएमचे डॉ. परवेज आश्रफी यांची मागणी.

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेली घोडेपीर दर्गा पाडली; नागरिकांमध्ये संताप

नगरः नगर शहरात मध्यवर्ती भागामध्ये पटवर्धन चौक ते गांधी मैदान रस्त्यावर असलेल्या घोडे पीर दर्याची रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने नगर शहर आणि परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांत एकीकडे संताप व्यक्त होत असताना तणावाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. याबाबत पोलिसांनी तीव्र दखल घेतली असून परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे स्थानिक पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्याबरोबरच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून शांतता राखण्याचे आवाहन केलेले आहे. याबाबत एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, “काही लोकांना अहमदनगर मध्ये दंगल घडवायची आहे. यासाठी ते प्रयत्न करत आहे. रात्रीच्या अंधारात दर्याच्या तोडफोड करणे याला मर्दानगी म्हणत नाही. असे काम षंढ संघटन करत असते. आम्हाला प्रशासनावर विश्वास आहे.त्यांनी आरोपींचा शोध लावावा तसेच याचे मुख्य सूत्रधार शोधून काढावे. या दर्गयाला मानणारे मुस्लिम समाजापेक्षा जास्त हिंदू समाज आहे. आणि हेच या दर्गयाची देखभाल करतात.” असे डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा