शाहिरांनी गाजवले आळंदीत मध्यवर्ती साहित्य संवाद

अहिल्यानगर (प्रतिनिधी):
भलरी म्हणा र...धरा सुरत ठेका 
शिवार राखाया अशी गोपन फेका.... 
पहाडी आवाजाचा शाहीर भारत गाडेकर आळंदीतील दुसऱ्या राज्यस्तरीय मध्यवर्ती साहित्य संवाद व काव्य संमेलनात गात होता आणि साथ संगत होती शब्दगंध टीमची.....
अख्ख सभागृहच नव्हे तर राधाकृष्ण मंगल कार्यालया जवळून जाणारे सर्व भक्तगण वळून वळून पाहत होते. या भलरीने आळंदी येथील मध्यवर्ती साहित्य संवाद कार्यक्रम गाजवला. 
        शाहीर भारत गाडेकर यांना शाहीर वसंत डंबाळे, शिवाजी थेटे दिगंबर गोंधळी राजेंद्र फंड भगवान राऊत प्रशांत सूर्यवंशी हौसिनाथ बोर्डे यांनी साथ दिली. 
हौशीनाथ बोर्डे यांनी 
विद्ये विना मती गेली, मती विना गती गेली 
 सांगतो ज्योतिबा.... असा पोवाडा सादर केला. तर प्रशांत सूर्यवंशी यांनी जेजुरीच्या खंडेरायाचे जागरण गीत गायले.
कु. दिशा गोसावी, हर्षली गिरी, स्नेहल रूपटक्के,सरला सातपुते,आरती गिरी, शामा मंडलिक, डॉ अशोक कानडे यांनीही शाहिरांच्या सुरात सुरू मिळवले. 
           अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या शाहिरी जलशात कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र चोभे, उद्घाटक फकीरा पवार, शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्यासह सर्वच साहित्यिक कवी पत्रकार रसिक भिजून चिंब झाले.
 दिवसभर या शाहिरांनी गायलेल्या पोवाड्याची आणि गीतांचीच चर्चा होत होती. 
शाहीर भारत गाडेकर हे शब्दगंध साहित्यिक परिषदेचे कार्यवाह असून गेल्या अनेक वर्षापासून आपल्या पहाडी आवाजाने विविध साहित्य संमेलनामध्ये रंगत आणतात. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही भारत गाडेकर यांच्याच गीताने होते.
शाहिरांनी गायलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक प्राचार्य डॉ.जी पी ढाकणे, डॉ. मिलिंद कसबे, ज्ञानदेव पांडुळे, डॉ. अशोक दौंड,चंद्रमणी इंदुलकर,डॉ. किशोर धनवटे, रेवन्नाथ कानडे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा