रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल तर्फे रिमांड होम मध्ये रक्षाबंधन संपन्न

नगर - “देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे” या उक्तीप्रमाणे आणि रोटरीचे घोषवाक्य Service Above Self सर्व्हिस अबाऊ सेल्फ यानुसार रोटरी क्लबच्या सदस्यांनी दातृत्वाचे सुंदर उदाहरण घडवले.
कार्यक्रमासाठी रो.मनोज चंगेडिया गहू गोणी ५, तेल डबा १,मुलींसाठी कॉस्मेटिक्स, मेंहदी कोन व इतर साहित्य, रो. निवृत्ती झिने खाऊ साहित्य, रो.विनोद बोरा सफरचंद पेटी, रो.राजेश परदेशी राख्या, रो. हरीश पेमदाणी एक तेल डबयाचे योगदान दिले.
सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहून आपली सेवा दिली.
यावेळी पीडीजी रो. शिरीष रायते सर, रो. ईश्वर बोरा,रो.विनोद बोरा, रो.निवृत्ती झिने, रो.मनोज चंगेडिया,
रो.राजेश परदेशी,रो. संजय मुनोत, रो. अजय गांधी,रो. विजय जुंदरे, रो. अमृत कटारिया,रो. नरेंद्र चोरडिया, रो. सुजाता कटारिया,रो.मनीष बोरा, अँन्स नीलम परदेशी,साजरी परदेशी,
रिमांड होम संस्थेचे सचिव फातिमा मॅडम सर्व शिक्षक व मदतनीस विद्यार्थी व विद्यार्थिनी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना वरुन बोलताना रो.सुनील कटारिया यांनी  सर्वांना रक्षाबंधनाच्या  शुभेच्छा दिल्या.व म्हणाले की,हा सण फक्त भाऊ बहिणीच्या नात्याचा नाही,तर प्रेम,विश्वास आणि संरक्षणाच्या वचनाचा उत्सव आहे. राखी ही फक्त दोऱ्याची गाठ नसून,मनांनाजोडणारी भावनिक नाळ आहे.
स्वतःवर विश्वास ठेवा,शिक्षणाला प्राधान्य द्या,आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा.जशी राखी जबाबदारीची जाणीव करून देते, तशीच तुम्हीही समाजात आपले स्थान निर्माण करा. रोटरी क्लब नेहमीच तुमच्या पाठीशी आहे.असे सांगितले.
मनोगत व्यक्त करतांना पीडीजी रो. शिरीष रायते सर म्हणाले की हा उपक्रम गेल्या 3० वर्षांहून अधिक काळ रोटरी सेंट्रल सातत्याने राबवत आहे.
फातिमा मॅडम यांनी रिमांड होम संस्थेच्या वतीने रोटरी क्लबच्या सातत्यपूर्ण मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
रो.ईश्वर बोरा यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा