नोटरी असोसिएशन जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड.शेख हाफिज एन.जहागीरदार

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशन चे अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी नोटरी पब्लीक अ‍ॅड. शेख हाफिज एन. जहागीरदार यांची नुकतीच महाराष्ट्राचे अध्यक्ष अ‍ॅड. सय्यद सिकंदर अली, कार्याध्यक्ष अ‍ॅड. यशवंतराव खराडे, अ‍ॅड. प्रविण एच. नलावडे यांनी निवड केली असून तसे पत्र दिले आहे.
भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांचे विधी व न्याय विभागामार्फत नोटरी कायदा १९५६ मधील कलम ४ (१) प्रमाणे वकिलांमधून नोटरी यांची नियुक्ती केलेली आहे. महाराष्ट्रात अनेक नोटरी कार्यरत असुन वेगवेळ्या शासकीय कार्यालयात लागणारे प्रतिज्ञानापत्रे, करारनामे, अधिकारपत्र, मृत्युपत्र भाषांतर, सांक्षकण तसेच न्यायालयात दाखल करावयाचे प्रतिज्ञापत्रे करण्याचे काम नोटरी करतात, सदर कामे करताना नोटरी यांना त्यांचा परवाना नुतनिकरण, शासकिय स्थरावर व पोलिसांत दाखल होणारे गुन्हे व इतर अडचणीचे निवारण करणे करीता महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनची सुमारे २२ वर्षापुर्वी स्थापना झालेली आहे व सदर संस्था ही नोटरींचे न्याय हक्का करीता संघर्ष करीत आहे व त्याकरीता वेळोवेळी नोटरीं करीता मार्गदर्शन शिबिरे, मेळावे, चर्चासत्राचे आयोजन करीत आहे. दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी रामकृष्ण मोरे सभागृह पिंपरी चिंचवड, पुणे येथे महाराष्ट्रातील नोटरींची ५ व्या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यांत आलेले आहे.
सदर परिषदे मध्ये सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती तसेच केंद्रीय कायदा मंत्री व विधि विभातील अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच महाराष्ट्र उत्कृष्ट विधी तज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सदर परिषदेस जिल्ह्यातील सर्व नोटरी यांनी उपस्थित राहाण्याचे आव्हान केलेले आहे.
अ‍ॅड. शेख हाफिज एन जहागीरदार हे सन १९९६ पासुन जिल्हा न्यायालयात वकील व्यवसाय करीत आहे. सन २००७ मध्ये भारत सरकारचे विधि व न्याय विभागाने त्यांची नोटरी पब्लीक म्हणुन नियुक्ती केलेली आहे. अ‍ॅड. हाफिज जहागीरदार यांना सामाजिक चळवळीचा चांगला अनुभव आहे, त्यांनी विद्यार्थीदशे पासुन विद्यार्थी संघटना एन. एस. यु.आय चे शहर उपाध्यक्ष, विद्यार्थी कृती समितीचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केलेले आहे, तसेच विधी व्यवसाय करीत असताना अहमदनगर शहर वकिल संघटनेचे सचिव व लॉयर्स को-ऑप सोसायटीचे व्हा. चेअरमन म्हणुन पद भुषविलेले आहे. सध्या लॉयर्स को-ऑप सोसायटीचे संचालक, अमन व इन्साफ फौन्डेशनचे सचिव व हजरत पिर सरकार शाहा शरीफ दर्गाचे विश्वास्त म्हणून काम पाहात आहे अ‍ॅडव्होकेट प्रोटेक्शन अ‍ॅक्ट चे मागणी करीता झालेल्या अंदोलनात देखील त्यांचा सक्रिय सहभाग होता. अ‍ॅड. हाफिज जहागीरदार यांना सामाजिक चळवळीचा दांडगा अनुभव असल्यानेच त्यांची महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनचे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यांत आली असुन त्यांचे निवडीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात संघटनेला बळकटी मिळणार आहे. 
अ‍ॅड. हाफिज जहागीरदार यांचे निवडी मुळे जिल्ह्यातील विधी व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार गुलामकादर
 जहागीरदार / उर्फ जी.एम.

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा