नगर : ए व्हिजन फॉर हेल्दीनेशन यासंकल्पनेतून कार्यरत असलेल्या मेडेव्हिजन तर्फे ८ वे अखिल भारतीय वैद्यकीय व दंतचिकित्सा विद्यार्थी अधिवेशन दिनांक १३ व १४ सप्टेंबर २०२५ रोजी डॉ. विठ्ठलराव विखेपाटील फाऊंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालय, अहिल्यानगर येथेआयोजित करण्यात येणार आहे. देशभरातील वैद्यकीय आणि दंतचिकित्सा क्षेत्रातील विद्यार्थी या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी होणार असून हे व्यासपीठ नव्या पिढीतील आरोग्य सेवकांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे.
या अधिवेशनाचा प्रमुख विषय "समग्र आरोग्यसेवाः मन शरीर जीवनशैली" असा असून मानसिक स्वास्थ्य, प्रतिबंधात्मक आरोग्य, जीवनशैली औषधोपचार, पर्यायी आरोग्य पद्धती तसेच सामुदायिक आणि पर्यावरणीय आरोग्य यां सारख्या विविध अंगांवर मार्गदर्शक चर्चा होणार आहेत.
दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये आदर्श व्यक्तिमत्व सत्रे, चिकित्सकीय कार्यशाळा, संशोधन निबंध व पोस्टर सादरीकरण तसेच वैद्यकीय आणि दंत शिक्षणाच्या भविष्या संदर्भातील चिंतनपर मंथन होणार आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असून विद्यार्थ्यांना अनुभवांची देवाण घेवाण आणि नवनवीन कल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे.
या अधिवेशनाचे नेतृत्व मेडेव्हिजनचे राष्ट्रीय संयोजक डॉ. मौलिक ठाक्कर तसेच मेडेव्हिजनचे राष्ट्रीय सहसंयोजक डॉ. शंकर सुर्यवंशी, डॉ. सचिन यादव, डॉ. पलक महेश्रम व ईश्वर यादव यांच्या मार्गदर्शना खाली होणार आहे. ज्ञान, नेतृत्व आणि आरोग्य विषयक सजगता यांचा संगम घडवून आणत हेअधिवेशन विद्यार्थ्यांना प्रेरणादेणार असून निरोगी भारत घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन सत्र दिनांक 13 सप्टेंबेर रोजी सकाळी ठीक 11 वाजता होणार असून सत्रास प्रमुख उपस्थिती म्हणून मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील (कॅबिनेट मंत्री, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन) व प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र. कुलगुरू, प्रा. डॉ. मिलिंद निकुंभ, राष्ट्रीय सह संघटन मंत्री अभाविप एस बालकृष्ण, मेडिविजनचे राष्ट्रीय संयोजक डॉ. मौलिक ठक्कर उपस्थित असणार आहेत. व अधिवेशनाचा समारोप दिनांक 14 सप्टेंबेर रोजी दुपारी 5 वा. होणार असून या समारोपास माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. वीरेंद्र सिंग सोलंकी अभाविपचे राष्ट्रीय सह संघटन मंत्री, देवदत्त जोशी उपस्थित राहणार आहेत.
Post a Comment