पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे भक्तांचे लाडके आराध्य-दैवत! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे पुणे शहराच्या गौरवाभिमानाचा सर्वोच्च कळस म्हणता येईल. दरवर्षी भारतभरातले आणि देशोविदेशीचे असंख्य भक्त ह्या गणेशाच्या दर्शनाला येतात.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे भक्तांच्या आदर-भक्तीचे स्थान तर आहेच, पण त्याहीपुढे जाऊन समाजसेवेला आणि सांस्कृतिक संवर्धनाला कृतिशील हातभार लावणारी एक महत्त्वाची संस्था म्हणूनही हे स्थान ओळखले जाते. ’श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’ या नावाने ही कार्ये केली जातात. या मंदिराला एक मोठी आणि वैभवशाली परंपरा आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट च्या माध्यमातून केलेल्या जनकल्याणाच्या कार्याची दखल घेत इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड च्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट चे कोषाध्यक्ष महेशराव सूर्यवंशी इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड चे उपाध्यक्ष डॅा दीपक हरके यांच्या हस्ते
महेशराव सूर्यवंशी यांना इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आले.
Post a Comment