श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट चे कोषाध्यक्ष महेशराव सूर्यवंशी इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड ने सन्मानित

पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे भक्तांचे लाडके आराध्य-दैवत! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे पुणे शहराच्या गौरवाभिमानाचा सर्वोच्च कळस म्हणता येईल. दरवर्षी भारतभरातले आणि देशोविदेशीचे असंख्य भक्त ह्या गणेशाच्या दर्शनाला येतात.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे भक्तांच्या आदर-भक्तीचे स्थान तर आहेच, पण त्याहीपुढे जाऊन समाजसेवेला आणि सांस्कृतिक संवर्धनाला कृतिशील हातभार लावणारी एक महत्त्वाची संस्था म्हणूनही हे स्थान ओळखले जाते. ’श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’ या नावाने ही कार्ये केली जातात. या मंदिराला एक मोठी आणि वैभवशाली परंपरा आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट च्या माध्यमातून केलेल्या जनकल्याणाच्या कार्याची दखल घेत इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड च्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट चे कोषाध्यक्ष महेशराव सूर्यवंशी इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025  ने सन्मानित करण्यात आले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड चे उपाध्यक्ष डॅा दीपक हरके यांच्या हस्ते 
महेशराव सूर्यवंशी यांना इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025  ने सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा