शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांना साहित्य गौरव पुरस्कार प्रदान

अहिल्यानगर (प्रतिनिधी):  येथील शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांना त्यांच्या साहित्य, कला व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे उपनगर शाखा सावेडी च्या वतीने देण्यात येणारा मानाचा साहित्य गौरव पुरस्कार मराठी भाषा तथा उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
       महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, उपनगर शाखा सावेडी  च्या वतीने येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज च्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य, नाट्य संमेलनाच्या  समारोप समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
        सावेडीचे प्रमुख कार्यवाह जयंत येलुलकर, संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध अभिनेत्री गौरी देशपांडे, जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सचिव ॲड.विश्वासराव आठरे पाटील, प्रसिद्ध लेखिका सुनंदा अमरापूरकर, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, मसाप पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे,शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी, भगवान राऊत,भारत गाडेकर, ज्ञानदेव पांडुळे, प्रा.डॉ. अशोक कानडे, कवयित्री शर्मिला गोसावी, प्रा. डॉ. अनिल गर्जे, रवींद्र दानापुरे, प्राचार्य डॉ.बाळासाहेब सागडे, श्रीनिवास बोजा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
.    सन्मानपत्र,सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राजेंद्र उदागे हे गेल्या पंधरा वर्षांपासून शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या माध्यमातून साहित्यिक सांस्कृतिक व कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या या पंधरा वर्षाच्या प्रदीर्घ कामगिरीबद्दल हा मानाचा साहित्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अहिल्यानगर शहराचे आमदार संग्रामभैय्या जगताप,शब्दगंध संमेलनाचे स्वागताध्यक्ष, नगरसेवक संपतदादा बारस्कर, शब्दगंध चे मार्गदर्शक प्राचार्य शिवाजीराव देवढे,बापूसाहेब भोसले, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा