सर विश्वेश्वरय्या अभियंता दिवसा निमित्त कलाकार कट्टयावर अभियंत्यांचे ज्येष्ठ नागरिक संघ आगरकर मळा, तसेच जनहित परिषद व जागरूक नागरिक मंच यांच्यावतीने अभिष्टचिंतन

नगर - सर विश्वेश्वरय्या अभियंता दिवसा निमित्त वाडिया पार्क येथे नुकत्याच साकारलेल्या कलाकार कट्टा या ठिकाणी शहरातील संस्मरणीय योगदान देणाऱ्या काही अभियंत्यांचे ज्येष्ठ नागरिक संघ आगरकर मळा, तसेच जनहित परिषद व जागरूक नागरिक मंच यांच्या वतीने अभिष्टचिंतन करण्यात आले.
प्रथितयश अभियंते व मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे, यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ पत्रकार सुभाष गुंदेचा यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाची थीम होती... "जगातील प्रत्येक सुंदर आणि सृजनशील गोष्टींचा मुळ कलाकार हा खरा इंजिनिअरच असतो",
यावेळी बोलताना सुहास मुळे म्हणाले की आजच्या युगामध्ये जेवढे काही आधुनिक सुखसुविधा आणि साधन आपण अनुभवत आहोत याचा संशोधक आणि शिल्पकार एक  इंजिनियरच असतो, हल्ली फक्त कागदी पदव्या घेऊन मिळवणारे ड्रायव्हर उलटा फिरवायचा का सुलटा याचे देखील प्रॅक्टिकल ज्ञान नसलेले खाजगी कॉलेजातून फक्त ट्युशनच्या बूस्टर डोस वर बाहेर पडलेले अभियंते निर्माण झाल्यामुळे बांधलेले फुल सहा महिन्यात पडतात, रेल्वेचे रोड आणि लाईटचे डीपी एका दिवसाचे पावसात जमीन दोस्त होतात. 
आपल्या शहरात देखील रस्त्याचा उतार ज्या बाजूला असतो त्याच्या विरुद्ध दिशेला गटार बांधणारे, रस्त्या पेक्षा उंच मॅन होल बांधणारे इंजिनिअर(?) असलेले व नसलेले मर्जीतले ठेकेदार यामुळे विकासाचा सगळा बट्ट्याबोळ होतो. अशा या कागदी अभियंत्यांनी जरा मेंदूचा वापर करावा.
200 वर्षांपूर्वी उभारलेल्या गोष्टी आजही टिकू शकतात आणि थोडी अत्याधुनिकता हाताशी असून दोन वर्षांपूर्वीच्या गोष्टी का नाही टिकत?
असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यावेळी बोलताना आपल्या शहराचा विकास आराखडा तयार करण्यामध्ये मोठे योगदान देणारे निवृत्त शहर अभियंता एन, डी कुलकर्णी म्हणाले की स्वतःच्या डोक्याने नोकरीला आणि पगाराला खरा न्याय देऊन स्वतःच्या बुद्धिमत्तेने कोणाच्याही दबावाखाली काम न करणारे आमच्यासारखे निर्भिड अभियंते ही एक दुर्मिळ गोष्ट झालेली आहे.. त्यामुळे या क्षेत्रात विशेषतः सरकारी बाबतीत प्रगतीचा आलेख निराशाजनक आहे.
ज्येष्ठ अभियंते अमृत मुथा म्हणाले की कुठल्याही विकासासाठी राजकीय लोकांचा वरदहस्त असणं आवश्यक झालं आहे ही गोष्ट खेदाची आहे.
आमच्या पिढीमध्ये असं फारसं, नसल्यामुळे आम्ही मोठी कामं करू शकलो. जी आजही दर्जेदार वाटतात. वास्तविक आज सुहासभाईं सारख्या निर्भीड आणि  कल्पनाशक्ती असलेल्या सृजनशील व्यक्ती चा लोकप्रतिनिधींनी उपयोग करून कुठलाही कमीपणा न बाळगता श्रेय वादात न अडकता चांगल्या गोष्टी प्रत्यक्षात उतरवल्या पाहिजेत. त्याचाच परिणाम म्हणून हा कलाकार कट्टा निर्माण झाला आहे.
शहरातील एक यशस्वी उद्योजक आणि जेष्ठ यांत्रिक अभियंते संपत मुथियान यांनी असे मत व्यक्त केले की अभियंता मुळात स्वतः काहीतरी करायची हिंमत आणि कर्तृत्व असलेला व्यक्ती असतो, त्यामुळे त्याने  नुसती हमाली नोकरी करणारा न होता, योग्य अनुभव प्राप्त करून इतरांना नोकरी देणारा छोटा मोठा उद्योजक कारखानदार व्यावसायिक होणे गरजेचे आहे, आणि त्यासाठी सरकारने अधिक गंभीर होणे गरजेचे आहे, त्या काळात आमच्यासाठी असे कोणी नसताना अक्षरशः शून्यातून जग निर्माण केले., याचा अभिमान आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे सुभाष गुंदेचा म्हणाले की जेव्हा गुंडगिरी वाढते तेव्हा राजकारण आणि समाजकारण आणि एकंदर विकास या सर्वांच वातावरण बिघडतं.. अशावेळी समाजाला दिशा देणारे घटक म्हणजे अभियंते, ज्येष्ठ विधीज्ञ, समाजसेवक, डॉक्टर आणि  व्यावसायिक, कारखानदार यांनी  मला वेळच नाही ही सबब बाजूला ठेवून अशा प्रकारचे छोटे-मोठे कार्यक्रम घडवून आणले पाहिजेत, विचारांचे आदान प्रदान आणि नवीन नवीन कल्पना एकजुटीने राबवणे अतिशय गरजेचे झालेले आहे.
उपस्थित असलेल्या सर्व अभियंत्यांचा ज्येष्ठ पत्रकार सुभाष गुंदेचा, व्यावसायिक दत्ताजी गायकवाड, योगेश गणगले, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव अशोक आगरकर, ॲड. लुणे व फुलसौंदर साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला मनपाचे निवृत्त पाणीपुरवठा अभियंता महादेव काकडे तसेच आर्किटेक्ट घोडके, वाडिया पार्क येथील मुथा साहेब, यांचाही सत्कार करण्यात आला, मनपाचे पाणी नियोजन अभियंते परिमल निकम साहेब,  बांधकाम विभागाचे पारखे साहेब, निंबाळकर साहेब, 
महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे कार्यकारी अधिक अभियंते चव्हाण साहेब यांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा