श्रीरामपूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्यातील सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध प्रश्नावर गेल्या अनेक वर्षापासून लढा देत असलेल्या ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनच्या आहिल्यानगरच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी श्रीरामपूर येथील सामाजीक कार्यकर्ते व धान्य दुकानदार रज्जाक पठाण यांची तर जिल्हा सचीवपदी नेवासा तालुक्यातील रास्तापूर येथील सामाजीक कार्यकर्ते व धान्य दुकानदार भरत भाकड यांची नियुक्ती करण्यात आल्याचे फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे यांनी घोषीत केले.
श्रीरामपूर तालुक्यातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान हरीहर केशवगोविंद बन येथे ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स फेडरेशनच्या नुकत्याच संपन्न झालेल्या आहिल्यानगर जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात या घोषणा करण्यात आल्या. मेळाव्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूरचे तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले हे होते तर या मेळाव्यास फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी बाबुराव म्हमाणे, नाशिकचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे, पुणे विभागीय अध्यक्ष शहाजी लोखंडे, जिल्हाध्यक्ष काशिनाथ आरगडे, मार्गदर्शक देविदास देसाई, नेवासा तालुकाध्यक्ष सुरेशराव उभेदळ, चंद्रकांत झुरंगे, विश्वासराव मोहिते, बाबा कराड, रासपचे आत्माराम कुंडकर, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक दशरथ पिसे, सुर्योदय पतसंस्थेचे संस्थापक दिलीपराव गायके, ज्ञानदेव वहाडने, विष्णुपंत डावरे आदि व्यासपिठावर उपस्थीत होते.
आपण आहिल्यानगर जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदार, परवानाधारक यांना कामकाजात दैनंदिन येणार्या समस्या तसेच परवाना विषयी शासन दरबारी नियमानुसार अडचणी निवारण करण्याकरीता आपली नियुक्ती करण्यात येत आहे तसेच हि निवड झाल्यापासून जिल्हा, तालुका व शहरातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदारास व परवाना धारकास योग्य तो न्याय देण्याचे कामकाज करत रहावे असे या नियुक्ती पत्रात सुचीत करण्यात आले आहे.
श्रीरामपूर शहरातील रज्जाक चाँदखान पठाण यांनी यापुर्वी फेडरेशनमध्ये जिल्हा सहसचीव, जिल्हा सचीव या पदाबरोबरच सय्यदबाबा ऊर्स कमेटीत सचीव व कार्याध्यक्षपद त्याच बरोबर काँग्रेसचे जिल्हासचीवपद भुषविले आहे, नेहमीच सामाजीक कार्यात अग्रेसर असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना जिल्हा कार्याध्यक्षपद मिळाले आहे तर नेवासा तालुक्यात सामाजीक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे तालुक्यात राजकीयदृष्ट्या मोठ्या व महत्वाच्या असलेल्या रास्तापुर ग्रामपंचायतीचे सदस्य, सोसायटीचे संचालकपद भुषवित असलेले भरत नामदेव भाकड हे नेवासा तालुक्यात नेहमीच स्वस्त धान्य दुकादारांच्या प्रश्नावर लढवय्ये असल्याने त्यांना जिल्हा सचीवपद बहाल करण्यात आले आहे.
यावेळी जेष्ठ पत्रकार लालमहमद जहागीरदार, प्रकाश गदीया, सुखदेव खताळ, राजेंद्र वाघ, भगवानराव तेलोरे, गणेशराव एलम, प्रकाश गदीया, कांताराम पवार, सयराम साबळे, अजीज शेख, योगेश नागले, सुधिर गवारे, किरण मुठे, भाऊसाहेब वाघमारे, शिवाजी नवले, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब कांगुणे, एस.एल घोगरे, अनिल मानधना, दादासाहेब मैराळ, विकी काळे, राजन वधवाणी, नानासाहेब वाक्चौरे, लालाभाई शेख, शिवाजी गिठे, सोमनाथ लोंढे, शामराव गुंजाळ, बाळासाहेब राठोड, दिगंबर शिंदे, ज्ञानदेव शेळके व समाधान मुंगसे आदिंसह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार, विविध कार्यकारी संस्थांचे प्रतिनिधी व महिला बचत गटांचे प्रतिनिधी उपस्थीत होते.
إرسال تعليق