राजस्थान अबूरोड येथील पत्रकारांच्या राष्ट्रीय काॅंन्फ्रन्स मध्ये मखदुम समाचार ची टीम सहभागी

ब्रह्म कुमारी प्रतिष्ठानच्या मीडिया विंग तर्फे २६ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत आबूरोड येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात मखदुम उर्दू व मखदुम समाचार ची  टीम देखील सहभागी झाली आहे. यामध्ये मुख्य संपादक आबीद दुले खान, कार्यकारी संपादक डॉ कमर सुरुर, उपसंपादक शेख फिरोज हसन, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शमा फारुकी, ज्येष्ठ पत्रकार रामदास ढमाले,भुषण देशमुख, सुरेखा ढमाले, पंढरीनाथ गायकवाड आदींचा समावेश आहे.
शुक्रवार, दिनांक २६ ते मंगळवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत चालणाऱ्या या संमेलनात संपूर्ण भारतातील वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ, केबल, शासकीय मीडिया संस्था, जनसंपर्क अधिकारी, जाहिरात संस्था, सायबर मीडिया, दूरसंचार व पोस्ट विभाग तसेच मीडिया शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
निसर्ग व अध्यात्माचा संगम असलेल्या माऊंट आबू येथे सहभागी प्रतिनिधींना संमेलनासोबतच पर्यटनाचीही संधी मिळाली आहे. तलाव, धबधबे, बगीचे, डोंगर-दऱ्या, नेत्रदीपक सुर्यास्त दृश्ये तसेच देलवाडा मंदिरे, अचलगढ, गुरुशिखर, आबू अंबाजी, पीसपार्क, ज्ञानसरोवर, पांडवभवन, शांतीवन व ग्लोबल हॉस्पिटल यांसारखी आध्यात्मिक व ऐतिहासिक स्थळे आकर्षण ठरली आहेत.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा