राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह सर्वसामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्याचा फटका विद्यार्थ्यांनाही बसला आहे. अनेक विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी असल्याने त्यांच्या शिक्षणावर संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) अहिल्यानगर जिल्हा शाखेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्रात तीव्र आंदोलन छेडण्यात आले.
ABVP ने विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी केली आहे की,
अतिवृष्टीग्रस्त भागातील सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क व शिक्षण शुल्क पूर्णपणे माफ करण्यात यावे.
ज्यांनी परीक्षा शुल्क आधीच भरले आहे, त्यांनाही परतावा देण्यात यावा.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत, विशेषतः मराठवाडा, नाशिक आणि उत्तरेतील भागांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शाळा–महाविद्यालयातील शिक्षणावरही परिणाम झाला आहे. पुणे आणि नाशिक विद्यापीठांत हजारो विद्यार्थी परीक्षांसाठी नोंदणीकृत असून, त्यांच्यावर या संकटाचा थेट परिणाम झाला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देणे अत्यावश्यक असल्याचे ABVP जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पायघन यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाऊ देणार नाही; जोपर्यंत विद्यापीठ शुल्क माफ करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील.”
إرسال تعليق