नगर - शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दीपावली काव्यसंध्या आयोजित करण्यात आली असून दीपावलीच्या आनंद उत्सवात हा काव्य सादरीकरणाचा फराळ नगरकर रसिकांना मिळणार असुन जास्तीत जास्त नवोदित साहित्यिकांनी सहभागी व्हावे."असे आवाहन शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी व अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी केले आहे.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या कार्यकारी मंडळाची बैठक कोहिनूर मंगल कार्यालयात अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. काव्य संमेलनाचे नियोजन योग्य पद्धतीने व्हावे तसेच कवींनी आपली कविता सादर करताना त्याची योग्य पद्धतीने निवड करावी, याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीस संस्थापक सचिव सुनील गोसावी, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, प्रा.डॉ. तुकाराम गोंदकर, प्रा.डॉ. अनिल गर्जे, राजेंद्र फंड, प्रा.डॉ. अशोक कानडे उपस्थित होते.
काव्यसंध्या काव्य संमेलनात नवोदित कवीं, युवक, युवती व बालकवीं यांच्यासह महिलांचा सहभाग देखील लक्षणीय असतो. यापूर्वी झालेल्या काव्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कवी प्रकाश घोडके, डॉ. संजय कळमकर, एस. बी. शेटे, प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये, प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे, प्रिया धारूरकर, प्रा. डॉ. सुधाकर शेलार यांची निवड करण्यात आली होती. यावर्षीचे दीपावली काव्यसंध्या संमेलन यशस्वी करण्यासाठी समिती तयार करण्यात आली असून लवकरच या काव्य संमेलनाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांची घोषणा करण्यात येणार आहे. नवोदितांनी दीपावली काव्यसंध्या मध्ये सहभागी होण्यासाठी ९९२१००९७५० वर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीस शर्मिला गोसावी, बबनराव गिरी, राजेंद्र चोभें, बाळासाहेब शेंदुरकर, प्रशांत सूर्यवंशी, मकरंद घोडके,बाळासाहेब देशमुख, रूपचंद शिदोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
إرسال تعليق