अहिल्यानगर( प्रतिनिधी ): 'साहित्यिकांशी आलेल्या संपर्कामुळे सामाजिक प्रश्न मांडण्याची प्रेरणा मिळाली असून शब्दगंध प्रामाणिकपणे चांगली माणसे जोडण्यासाठी प्रयत्नशील आहे, सातत्याने चालू असलेले साहित्यिक उपक्रम निश्चितच नवोदित साहित्यिकांना प्रेरणा देतात, त्यामुळे शब्दगंध च्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहूव असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपतदादा बारस्कर यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने कोहिनूर मंगल कार्यालयात दीपावली काव्यसंध्या व शब्दगंध स्मरणिका प्रकाशन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ कवी प्रा.चंद्रकांत कर्डक हे होते. विचारपिठावर दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब भोसले, मुख्याध्यापक शिवाजीराव लंके, शिवाजीराव विधाते, महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य जयंत येलुलकर, पुस्तक संकलक शब्बीर शेख, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे संस्थापक सुनील गोसावी, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना संपतदादा बारस्कर म्हणाले की, शब्दगंध मध्ये केवळ साहित्यिकांनाच विचारपीठ उपलब्ध करून देण्यात येत नाही तर आमच्या सारख्या समाज कार्यकर्त्यांनाही विचारांचे आदान प्रदान करण्यासाठी येथे संधी मिळते.सातत्याने शहरां मध्ये शब्दगंध उपक्रम राबवित असल्याने आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असुन शब्दगंध ला पाठबळ देऊ असे आश्वासन त्यांनी दिले.
अध्यक्षपदावरून बोलताना प्रा. चंद्रकांत कर्डक म्हणाले की, यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शेतकरी,कष्टकरी अडचणीत सापडलेला आहे, अशाप्रसंगी लेखकांनी आपली लेखणी या विषयावर चालवली पाहिजे, सर्वांच्या सुखदुःखात लेखक, कवींना सहभागी होता आले पाहिजे,नव्याने लिहिणाऱ्यांनी वाचले पाहिजे. सामाजिक विचार करण्याची प्रवृत्ती वाढली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने लेखक कवींकडून समाज प्रबोधनाचे काम घडू शकेल.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. संजय नगरकर म्हणाले की, सातत्यपूर्ण उपक्रमामुळे शब्दगंध ही साहित्यिक संस्था आता राज्यभर आपल्या कार्याचा ठसा उमटमत आहे, अनेक साहित्यिक मित्र याबद्दल चर्चा करत असतात, ही चर्चा ऐकून आनंद वाटतो. समाजाशी लेखक कवींनी नाळ जोडून घ्यायला हवी हा विचार येथे मिळतो.
मराठी भाषेच्या समृद्धीसाठी अशा छोट्या मोठ्या उपक्रमाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भाषा सल्लागार समितीचे सदस्य जयंत येलूलकर यांनी केले.
यावेळी शिवाजीराव विधाते, बापूसाहेब भोसले, शिवाजीराव लंके, शब्बीरभाई शेख यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले तर शेवटी राज्य संघटक प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री शर्मिला गोसावी यांनी केले. सुरुवातीला शाहीर भारत गाडेकर व प्रशांत सूर्यवंशी यांनी प्रबोधनाची गीते सादर केली.
यावेळी झालेल्या काव्य संमेलनामध्ये डॉ. संजय बोरुडे,बाळासाहेब देशमुख, हौशीनाथ बोर्डे, राहुल शिंदे, सुजाता पुरी, विनय पिंपरकर, शिरीष जाधव,पी.एन. डफळ, ऋता ठाकूर, शरद धनपे, वर्षा भोईटे, बबनराव गिरी, सुरेखा घोलप,सुजाता पुरी, रूपचंद शिदोरे,रेखा दहातोंडे,कृष्णा वाळके, महेश ढवळे, गौरव भुकन,प्रबोधिनी पठाडे, दुर्गा कवडे, शुभम घोडके, समृद्धी सुर्वे यांनी आपल्या काव्यरचना सादर केल्या. यावेळी प्राचार्य डॉ विश्वासराव काळे,ॲड. मीनानाथ देहाडराय, प्राचार्य जी.पी. ढाकणे, हरिभाऊ नजन, भगवान राऊत,राजेंद्र फंड, प्रा.डॉ.अनिल गर्जे, राजेंद्र पवार, प्रा.डॉ. तुकाराम गोंदकर, प्रा.डॉ. अनिल गर्जे, सुभाष सोनवणे, प्रा. एल.बी.जाधव, बाळासाहेब शेंदुरकर, रिता जाधव, शर्मिला रणधीर, ज्योती वाघमारे, मकरंद घोडके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऋषिकेश राऊत, दिशा गोसावी, भाग्यश्री राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रा. चंद्रकांत कर्डक यांच्या सुमधुर आवाजात कवितेने कार्यक्रमाचा समारोप झाला.
إرسال تعليق