नगर - केडगाव येथील रहिवाशी साकिब नजीरहुसेन पिरजादे यांची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती यांचे स्वीय सहाय्यकपदी निवड झालेली आहे. राजपत्रातील अधिकारी वर्ग-१ म्हणून त्यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. सध्या ते नगर जिल्हा न्यायालय मध्ये स्टेनोग्राफर वर्ग-२ म्हणून कार्यरत आहेत. वर्ग-१ पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप कष्ट व मेहनत घेऊन अभ्यास केला. महाराष्ट्र मध्ये त्यांनी १२ वा क्रमांक पटकावलेला आहे. साकिब पिरजादे यांचे वडील नजीरहुसेन पिरजादे हे सुद्धा प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांचे लघुलेखक श्रेणी १ म्हणून कार्यरत आहेत आणि लहान भाऊ काशीफ पिरजादे हे लॉ कॉलेज अहमदनगर येथे दुसऱ्या वर्षामध्ये शिक्षण घेत आहेत. साकीब पिरजादे यांच्या या यशामुळे नगर शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात व महाराष्ट्रात त्यांचे कौतुक करण्यात येत आहेत.
साकिब पिरजादे यांना पुढील वाटचालीस सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Post a Comment