नगर - नगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीवर रामचंद्र खुंट येथील स्वतंत्रता सेनानी मरहुम शेख चाँद यांचे नातु नईम सरदार यांची नियुक्ती करण्यात आली.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे केंद्रीय वर्किंग कमिटीने अहिल्यानगर शहर जिल्हा कार्यकारणीच्या नवीन कार्यकारणीला मान्यता दिली असून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव बी.एम. संदीप यांच्या मंजुरीने आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार दिप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत सर्वांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली आहे.
नईम सरदार हे मागील पंचवीस वर्षापासून अहमदनगर सोशल क्लब फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक काम करत आहे.शांतता समितीचे सदस्य आहे. व अहमदनगर जायका या हॉटेलचे मालक आहे. ते सतत शासनाच्या विविध उपक्रमा मध्ये सामील होऊन त्याला यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असतात. समाजात एकोपा नांदावण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Post a Comment