भावना दुखावल्या प्रकरणी आ. जगताप, मुथा, गोंडाळसह ट्रस्टीं विरुद्ध कोतवालीत तक्रार दाखल

प्रतिनिधी : श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघ (जैन मंदिर), कापड बाजार यांच्या मालकीच्या असणाऱ्या स्टेशन रोड वरील अक्षता गार्डन समोरील भूखंडावर असलेले मंदिर, प्रवचन स्थळ संगनमत करत पाडून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी आ. संग्राम अरुण जगताप, गणेश हरिभाऊ गोंडाळ, ट्रस्ट अध्यक्ष सुभाषला झुंबरलाल मुथा, ट्रस्टचे सर्व ट्रस्टी यांच्या विरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख किरण काळे, जैन समाजाचे मनोज सुवालाल गुंदेचा यांनी ही तक्रार दिली आहे. पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याकडे यावेळी तात्काळ सखोल तपास करण्याची मागणी काळे, गुंदेचा यांनी केली.
गुरुवारी पत्रकार परिषदेत माजी आ. रवींद्र धंगेकर, खासदार निलेश लंके यांनी तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर ही तक्रार दाखल झाली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, ट्रस्टच्या नावे स्टेशन रोड वर वॉर्ड नंबर २१ मधील म्यु.क.नंबर ४४ याचा सि.स.नं. फायनल प्लॉट नंबर ११९ चे क्षेत्रफळ ४७१.९९ चौरस मीटर हा भूखंड आहे. या भूखंडावर असणाऱ्या मिळकतीच्या तपशिलाची नोंद नगरपालिका दप्तरी परिशिष्ट - अ मध्ये आहे. या भूखंडावर मंदिर होते. अशी नोंद तेव्हाची अहमदनगर नगरपालिका आणि आत्ताची अहिल्यानगर महानगरपालिका दप्तरी परिशिष्ट - अ मध्ये स्पष्ट नोंद नमूद आहे. त्याचे पुरावे काळे, गुंदेचा यांनी पोलिसांना दिले आहेत. 
तक्रारीत पुढे म्हटले आहे, जैन समाजाचे 'तीर्थंकर' भगवान ऋषभनाथ, भगवान महावीर यांनी जैन तत्त्वज्ञान शिकवले आणि आध्यात्मिक मार्गदर्शन केले. भगवान महावीरांचे उपदेश अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे) या महाव्रतांवर आधारित आहेत. आम्ही त्याचे आचरण करतो. जैन मंदिर ट्रस्टच्या वर नमूद भूखंडावरील मंदिर तसेच प्रवचन स्थळ पाडण्यात आले आहे. या मुळे आमच्या धार्मिक आस्था, भावना दुखावल्या गेल्या आहेत. 
भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम २९८ नुसार कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळाला दुखापत करणे किंवा अपवित्र करणे हे कृत्य दंडनीय अपराध आह. या गुन्ह्यासाठी दोन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा अशी तरतूद आहे. हा एक अजामीनपात्र व दखलपात्र गुन्हा आहे. अपराध्यांवर बीएनएस कलम २९८ अन्वये तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी आम्ही तक्रार देत असल्याचे त्यात म्हटले आहे. 

सोबत : तक्रारीची received कॉपी जोडली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा