पुणे शहरात सध्या कायदा व सुव्यवस्था औषधालाही शिल्लक नाही. भर दिवसा होणारे खून, गोळीबार, कोयत्याचे वार, लूट, टोळी युद्ध हे चित्र पुण्यात सर्वत्र दिसत आहे. पुणेकरांना दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडताना जीव मुठीत घेऊन बाहेर पडावे लागत आहे. आपल्या परिवारातील सदस्य घराबाहेर जाताना ती जिवंत पुन्हा घरी येईल की नाही याची कोणालाही शाश्वती नाही. अशाच परिस्थितीत काल बाजीराव रोड येथे एका तरुणाची भर दिवसा निर्घृण हत्या झाली.
कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे, स्वतःला पुण्याचे शिल्पकार म्हणवणारे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र बिहारमध्ये स्वतःच्या पक्षाची जाहिरात करण्यात व्यस्त आहेत. या अनागोंदी कारभाराच्या विरोधात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आले. अभिनव कला महाविद्यालय चौक येथे झालेल्या या आंदोलनाच्या माध्यमातून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व पूर्ण वेळ आपल्या पक्षाच्या प्रचाराला द्यावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या अनागोंदी कारभाराचा, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निष्क्रिय नेतृत्वाचा निषेध व्यक्त केला. या वेळी डॉ.सुनील जगताप, किशोर कांबळे, मंजिरी घाडगे, असिफ शेख, अमोल परदेशी,अजिंकय पालकर, विष्णू सरगर, अनिता पवार, रुपाली शेलार, मदन कोठुळे, रोहन गायकवाड, फाहीम शेख, सुमित काशीद, रमीझ सय्यद ,हेमंत बधे, शिवराज मालवडकर, पुजा काटकर आणी शैलेंद्र भेलेकर उपस्तिथ होते.
إرسال تعليق