महायुतीतील कोणत्याही पक्षासोबत युती-आघाडी नाही, महाविकास आघाडी म्हणून एकजुटीने लढणार५२ व्या मासिक आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा निर्धार

महानगरपालिका निवडणुकीसाठी पूर्वतयारीचा शेवटचा टप्पा म्हणून आज आरक्षण सोडत जाहीर झाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची ५२ वी मासिक आढावा बैठक पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आढावा बैठकीत महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. आगामी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व इतर समविचारी गटांसोबत आघाडी करून निर्धाराने लढणार आहे. तसेच, पक्षाच्यावतीने इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज वाटपाचा शुभारंभही या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आला.
 कोणत्याही परिस्थितीत महायुतीतील घटक पक्षांसोबत आघाडी - युती करायची नाही असा निर्धार या बैठकीत करण्यात आला. महायुतीने पुणे शहराला ट्रॅफिक, गुन्हेगारी, बकालपणा अशा संकटात नेऊन सोडले आहे. तसेच, महायुतीतील तीनही पक्ष समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्यात आघाडीवर आहेत. अशा धर्मांध शक्तींना सोबत न घेता पुरोगामी महाराष्ट्राची पताका खांद्यावर घेऊन आपण पुणे शहराला पुन्हा एकदा सुसंस्कृत व सुनियोजित शहर बनवण्यासाठी निर्धाराने लढू अशी भूमिका प्रशांत जगताप यांनी जाहीर केले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी पक्ष कार्यालयातून उमेदवारी अर्ज घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. 
यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, ज्येष्ठ नेते श्री. अंकुशअण्णा काकडे, माजी शहराध्यक्ष श्री. रवींद्रअण्णा माळवदकर, श्री. प्रकाश मस्के यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा