सात्विक निशांत दातीर याची राज्य पातळीवरील रग्बी स्पर्धेसाठी निवड

नगर, दि.20-येथील समर्थ विद्या प्रशालेतील विद्यार्थी सात्विक निशांत दातीर याने क्रीडा क्षेत्रात भक्कम पाऊल टाकत 14 वर्ष वयोगटातील राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातून या स्पर्धेसाठी निवड होणारा सात्विक हा एकमेव विद्यार्थी ठरला आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीने जिल्ह्याची क्रीडा परंपरा उज्वल केली असून विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यापूर्वी कोपरगाव येथील समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या पुणे विभागीय शालेय रग्बी स्पर्धेत सात्विकने विशेष प्राविण्य प्राप्त केले. विभागीय स्तरावरील त्याच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर त्याची ठाणे जिल्ह्यातील शहाड येथील सेंचुरी रेहान हायस्कूल येथे होणार्‍या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा दि.23 नोव्हेंबर रोजी पार पडणार असून यानंतर देश पातळीवरील संघाची निवड केली जाणार आहे. त्यामुळे सात्विकला राष्ट्रीय स्तरावरही चमक दाखविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. सात्विकच्या यशामागे समर्थ विद्यामंदिर प्रशालेतील प्रशिक्षकांचे महत्त्वाचे योगदान आहे. संस्थेच्या मुख्याध्यापिका वसुधा जोशी व क्रीडा शिक्षक पोपट लोंढे यांनी सातत्याने मार्गदर्शन करून त्याची क्षमता घडवली. शाळेच्या क्रीडा विभागाने दिलेल्या प्रोत्साहनामुळे सात्विकने आपली कामगिरी अधिक परिणामकारकपणे सिद्ध केली आहे.सात्विक हा जेष्ठ पत्रकार निशांत दातीर व पुण्यश्‍लोक महिला बचत गटाच्या अध्यक्षा इंजि. शोभा दातीर यांचा मुलगा असून कुटुंबाने सातत्याने पाठिंबा व उत्तम वातावरण दिल्यामुळे सात्विकला क्रीडा क्षेत्रात प्रगती करता आली. त्याच्या या यशाची दखल घेत राज्याचे विधान परिषदेचे सभापती नामदार प्रा. राम शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राज्यस्तरीय स्पर्धेतून राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारण्याच्या तयारीत असलेल्या सात्विककडून मोठ्या अपेक्षा व्यक्त होत असून जिल्ह्यातील क्रीडा रसिकांचे लक्ष आता त्याच्या पुढील कामगिरीकडे लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा