अहिल्यानगर - नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट F-17 संदर्भात रेहान काझी व इतर यांनी दिशाभूल करणारे वक्तव्य करून समाजाची फसवणूक करत आहे.असे युनूस तांबटकर यांनी कळविले आहे. ते म्हणाले की,सत्य परिस्थिती अशी आहे की आम्ही उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या आदेशानुसार आज तागायत कामकाज करत आहोत. सावन मोबाईल विरुद्ध R. C.C.543/2025 असा दावा दाखल करण्यात आलेला आहे. सदर व्यक्तीला कोणत्याही बांधकामाची परवानगी मिळालेली नाही. तसेच या इमारतीला महानगरपालिकेने यापूर्वीच धोकादायक इमारत म्हणून जाहीर केलेले आहे. रेहान शफी काझी हा लोकांची दिशाभूल करत आहे. यावर कोणीही विश्वास ठेवू नये. आमचे सर्व व्यवहार चेक ने केले जातात,कारण संस्थेचे आर्थिक व्यवहार रोखीने होत नाही.असे असताना रेहान काझी यांनी खोटी बातमी दिली. संस्थेचे कार्यालयात पैसे आम्हाला द्यावेत असे सांगितले.सत्य परिस्थिती अशी आहे की रेहान शफी काझी यांना कोणताही कायदेशीर अधिकार नव्हता व नाही.यांनी बेकायदेशीर रित्या संस्थेच्या जागेतील वर्गाचे व शाळेच्या ऑफिसचे कुल्प तोडून स्वतः विश्वस्त आहेत असे भासवण्याचे प्रयत्न केलेले आहे. यामुळे या बोगस लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे. तसेच रोख स्वरूपात पैसे जमा केल्याबद्दल धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांनी अर्ज क्रमांक 61/ 2023 नुसार चौकशीचे आदेश दिलेले आहे. संस्थेचे सर्व व्यवहार हे चेक ने केले जातात. कोणताही रोखीचा व्यवहार होत नाही. रेहान काझी यांनी परस्पर संस्थेच्या नावावर व कॉलेज आणि एम इंग्लिश चे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. ही सत्य परिस्थिती असताना सभासदांची व भाडेकरींची दिशाभूल करणारे बातम्या देऊन स्वतः केलेला लाखो रुपयाचा भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न करत आहेत.असे युनूस तांबटकर यांनी कळविले आहे.
إرسال تعليق