'द ब्रॅण्ड हब आऊटलेट’च्या सवलत योजनेस ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद ः शादाब सय्यद

अहिल्यानगर : येथील रामचंद्र खुंट भागात असलेल्या करसेठजी रोडवरील ‘द ब्रॅण्ड हब आऊटलेट’ या दालनाच्यावतीने ब्रॅण्डेड शूजवर 50 ते 70 टक्के सवलत योजना सुरू आहे. या योजनेस ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ब्रॅण्डेड शूजमुळे ग्राहक अत्यंत समाधानी असल्याचे प्रतिपादन दालनाचे संचालक शादाब सय्यद यांनी केले.

गेल्या महिनाभरापासून ही सवलत योजना या दुकानातून दिली जात आहे. परिसरातील रहिवाश्यांसह केडगाव, भिंगार, सावेडी भागातील ग्राहकही या दालनास सकाळ ते सायंकाळ भेट देऊन अनेक प्रकारचे व पुमा, आदिदास, रिबॉक, क्लर्क्स, स्पायकर, स्केचर्स, अस् पोलो, एसिक्स आदि ब्रॅण्डेड शूज सवलतीत खरेदी करीत आहेत.

ब्रॅण्डेड शूजबरोबरच या दालनातर्फे आता ऑफीस चेअर्स, मॅट्रेसेस, हॉटेल आणि घरासाठी उत्कृष्ट प्रकारचे नवे नामांकित कंपनीचे फर्निचर 60 ते 70 टक्के सवलत योजनेत दिले जात आहे. या वस्तूंचा या दुकानात प्रचंड मोठा स्टॉक असून, ग्राहकांना निवडीसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत, अशी माहिती देण्यात आली.

ही सवलत योजना डिसेंबर अखेर सुरू असून, या योजनेचा आणखी ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक शादाब सय्यद यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा